esakal | कोरोना काळात भावनेपेक्षा वस्तूस्थितीला महत्व द्या : महसूलमंत्री बाळासाहेब थोरात
sakal

बोलून बातमी शोधा

Review of Corona in Sangamner city and taluka by the Revenue Minister

संगमनेर शहर व तालुक्यातील कोरोनाची साखळी तोडण्यासाठी प्रशासनाचे पूर्ण ताकदीनिशी प्रयत्न सुरु आहेत. यात नागरिकांनी दिलेल्या सहकार्यामुळे यात निश्चित यश मिळेल.

कोरोना काळात भावनेपेक्षा वस्तूस्थितीला महत्व द्या : महसूलमंत्री बाळासाहेब थोरात

sakal_logo
By
आनंद गायकवाड

संगमनेर (अहमदनगर) : संगमनेर शहर व तालुक्यातील कोरोनाची साखळी तोडण्यासाठी प्रशासनाचे पूर्ण ताकदीनिशी प्रयत्न सुरु आहेत. यात नागरिकांनी दिलेल्या सहकार्यामुळे यात निश्चित यश मिळेल. 

तालुक्याच्या ग्रामीण भागातील कोरोना रुग्णांची वाढती संख्या चिंताजनक असून, रॅपिड अँटीजेन चाचण्यांमुळे रुग्ण सापडत आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाणही चांगले आहे. भावनेपेक्षा वस्तूस्थितीला महत्व देत, तालुक्यात माझे कुटूंब माझी जबाबदारी अभियान अधीक सतर्कतेने व सक्षमपणे राबवण्याची सूचना महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी केली. एसएमबीटी दंत महाविद्यालयात झालेल्या कोरोना आढावा बैठकीत ते बोलत होते. 

हेही वाचा : अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर व अ‍ॅड. गुणरत्न सदावर्ते यांच्या विरोधात गुन्हा दाखल करा
ते म्हणाले, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण राज्यात माझे कुटुंब माझी जबाबदारी हे अभियान राबविण्यात येत आहे. या माध्यमातून तालुका पातळी, जिल्हा परिषद गट व पंचायत समिती गट व गाव निहाय विविध आरोग्य कमिट्यांद्वारे नागरिकांमध्ये जनजागृती सुरु आहे. विस्ताराने मोठ्या असलेल्या संगमनेर तालुक्यात चांगल्या वैद्यकीय सुविधा व नागरिकांनी घेतलेली काळजी यामुळे रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण चांगले आहे.

सहकारी संस्थांनी कोविड केअर सेंटर साठी प्रशासनाला चांगली मदत केली आहे. ग्रामीण भागामध्ये होणारे घरगुती समारंभ नागरिकांनी जाणीवपूर्वक टाळण्यासाठी पदाधिकार्‍यांनी मार्गदर्शन करावे. कोरोनाची काही लक्षणे जाणवल्यास, तातडीने जवळच्या रुग्णालयात तपासणी करुन घेण्याचे आवाहन करताना, तालुका लवकरच कोरोनामुक्त होणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला. तसेच अधिकाऱ्यांकडून सर्व व्यवस्थेची सविस्तर माहिती घेतली.

या वेळी प्रांताधिकारी डॉ. शशिकांत मंगळूरे, तहसीलदार अमोल निकम, उपविभागीय पोलिस अधिकारी रोशन पंडीत, मुख्याधिकारी डॉ. सचिन बांगर, गट विकास अधिकारी डॉ. सुरेश शिंदे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सुरेश घोलप, पोलिस निरीक्षक अभय परमार, सुनील पाटील आदी उपस्थित होते.

संपादन : अशोक मुरुमकर