esakal | बॉबीसाठी ऋषी आणि राज कपूर यांनी साईबाबांना केला होता हा नवस
sakal

बोलून बातमी शोधा

Rishi Kapoor had made a vow to Sai Baba

कपूर घराणे साईभक्त म्हणून ओळखले जाते. "मेरा नाम जोकर'ला अपेक्षित यश मिळाले नाही. त्यानंतर राज कपूर यांनी ऋषी यांना संधी देऊन "बॉबी' काढला. त्या वेळी चित्रपट प्रदर्शनाआधी आणि नंतर ते साईदर्शनाला आले होते.

बॉबीसाठी ऋषी आणि राज कपूर यांनी साईबाबांना केला होता हा नवस

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

शिर्डी : "बॉबी' या पहिल्या आणि सुपरहिट चित्रपटाचा नायक म्हणून ऋषी कपूर उदयाला आला. या चित्रपटाच्या प्रदर्शनापूर्वी त्याने आपले वडील शो-मॅन राज कपूर यांच्या समवेत येथे येऊन साईबाबांची करुणा भाकली. पुढे सातत्याने शिर्डीत येऊन त्यांनी, आपल्या वडिलांनी सुरू केलेली साईभक्तीची परंपरा कायम ठेवली. 

"बॉबी'च्या यशासाठी त्यांनी साईसमाधीवर माथा टेकला. शंभर चित्रपट आणि पंचेचाळीस नायिकांसोबत काम करणारे ऋषी कपूर आयुष्याच्या प्रत्येक वळणावर बाबांच्या दरबारात हजेरी लावीत राहिले. मुलगा रणबीर छोटा होता. त्याला कडेवर घेऊन त्यांनी साईसमाधीचे दर्शन घेतले होते. तेरा वर्षांपूर्वी रणबीरने "सावरिया' या चित्रपटाद्वारे हिंदी चित्रपटसृष्टीत पहिले पाऊल ठेवले, त्या वेळीही ऋषी त्याअला साईदर्शनासाठी घेऊन आले होते. 

हेही वाचा - अॉनलाईन मिटिंगला नेटवर्कचा अडथळा

कपूर घराणे साईभक्त म्हणून ओळखले जाते. "मेरा नाम जोकर'ला अपेक्षित यश मिळाले नाही. त्यानंतर राज कपूर यांनी ऋषी यांना संधी देऊन "बॉबी' काढला. त्या वेळी चित्रपट प्रदर्शनाआधी आणि नंतर ते साईदर्शनाला आले होते. कपूर घराण्याच्या नव्या पिढीचा हीरो म्हणून रणबीरच्या यशासाठी पुढे ऋषी कपूर यांनी बाबांना साकडे घातले. पुढे "बर्फी'च्या यशासाठी रणबीर वडील ऋषी यांच्यासोबत साईदरबारात हजर झाला होता. 

तीन वर्षांपूर्वी ऋषी कपूर एकटेच शिर्डीला आले. साईसंस्थानचे विश्वस्त सचिन तांबे यांनी त्याचे स्वागत केले होते. एरवी येथे आल्यानंतर क्षुल्लक कारणावरून रागावणारे ऋषी या भेटीत खुशीत होते. त्यांनी जो भेटेल त्याची फोटोसेशनची इच्छा पूर्ण केली. त्यांच्या वागणुकीतील हा बदल चकित करणारा होता.

नंतर बातमी आली, त्यांना कर्करोगाचे निदान झाले होते. आयुष्याची संध्याकाळ दिसू लागली. साईंच्या सावलीत क्षणभर विसावण्यासाठी ते येथे आले होते. आज त्यांच्या निधनाचे वृत्त आले. त्यांना ओळखणारे येथील सर्व जण हळहळले. 

loading image
go to top