
राहुरी: राहुरी फॅक्टरी येथे बुधवारी (ता. १०) अहिल्यानगर-मनमाड राष्ट्रीय महामार्गावर रास्तारोको आंदोलन करणाऱ्या रस्ता दुरुस्ती कृती समितीच्या नऊ जणांच्या विरोधात राहुरी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. अहिल्यानगर-सावळीविहीर रस्ता दुरुस्तीच्या मागणीसाठी रास्तारोको करण्यात आला होता.