
दुचाकी अडवून चाकूचा धाक दाखवुन हॉटेल व्यवस्थापाकाचे ४२ हजार रुपये लुटल्याची घटना कुकाणे येथे १६ डिसेंबरला रात्री घडली.
नेवासे (अहमदनगर) : दुचाकी अडवून चाकूचा धाक दाखवुन हॉटेल व्यवस्थापाकाचे ४२ हजार रुपये लुटल्याची घटना कुकाणे येथे १६ डिसेंबरला रात्री घडली. दरम्यान याप्रकरणी नेवासे पोलिसांत सहाजणाविरोधात दरोड्याचा गुन्हा दाखल झाला असून लुटारूंची ओळख पटविण्यात यश आल्याने तिन संशयित आरोपींना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. दरम्यान इतर आरोपी पसार झाले आहेत.
चिलेखनवाडी शिवारात नेवासे- शेवगाव महामार्गालगत असलेल्या यशराज या हॉटेलचे व्यवस्थापक रोहित संजय घाडगे (रा. चिलेखनवाडी, ता. नेवासे) यांनी याप्रकरणी नेवासे पोलिसांत फिर्याद दिली. दिवसभरातील झालेल्या हिशोबाचे पैसे घेवून हॉटेलचे मालक राहुल जावळे यांचे घरी देण्याकरीता जात असताना कुकाणे विदयलाय परिसरातील काळा ओढा पुलाजवळ त्यांच्या पाठीमागून दोन दुचाक्यांवर आलेल्या सहा जणांनी त्यांच्या दुचाक्या आडव्या लावून धाडगेबायांना चस्कुचा धाक दाखवून यांच्या खिशातील ४२ हजार रुपये लुटले.
नगर जिल्ह्यातील बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
याप्रकरणी नेवासे पोलिसांत शुभम विश्वनाथ गर्जे (रा. वडुले), अभिषेक आप्पासाहेब शिरसाठ (रा. नांदूरशिकारी), साहील बशीर पठाण (कुकाणे), अक्षय कानडे (पूर्ण नाव माहित नाही रा. चिलेखनवाडी) व रोहीत रमेश गडाख (कुकाणे) आणखी एक अल्पवयीन (रा. कुकाणे) असे सहा जणांविरोधत गुन्हा दाखल असुन पोलिसांनी रोहित गडाख, साहील पठाण व अक्षय कानडे यांना अटक केली आहे.
रस्तालूट व भुरट्याचोऱ्या वाढल्या
दोन अडीच महिन्यांपासून कुकाणे व परिसरात रस्तालूट व भुरट्या चोऱ्याचे प्रमाण वाढले आहे. यात स्थानिक व परिसरातील काहींचा सहभाग असलेल्याने भीतीपोटी कोणी पोलिसांत जात नसल्याची चर्चा नागरिकांत आहे. कुकाण्यात गुन्हेगारिस पाठबळ देणार्यासह गुन्हेगारांचा पोलिसांनी बंदोबस्त करावा अशी मागणी ग्रामस्थातुन होत आहे.
संपादन : अशोक मुरुमकर