पावणे दोन लाख रुपये घेऊन पळणाऱ्या चोरट्यांना पाटलाग करुन पकडले

गौरव साळुंके
Tuesday, 22 September 2020

पेट्रोल पंपावरील रक्कम बँकेत भरण्यासाठी निघालेल्या चितळी (ता. राहाता) येथील बी. जे. पेट्रोल पंप व्यवस्थापकाला चोरट्यांनी रस्ता अडवुन एक लाख ६८ हजार रुपयांचा ऐवज लुटण्याचा प्रकार सोमवारी घडला.

श्रीरामपूर (अहमदनगर) : पेट्रोल पंपावरील रक्कम बँकेत भरण्यासाठी निघालेल्या चितळी (ता. राहाता) येथील बी. जे. पेट्रोल पंप व्यवस्थापकाला चोरट्यांनी रस्ता अडवुन एक लाख ६८ हजार रुपयांचा ऐवज लुटण्याचा प्रकार सोमवारी घडला. अखेर ग्रामस्थांच्या सर्तकतेमुळे पाठलाग करुन जळगाव परिसरात चोरट्यांना पकडण्यात तालुका पोलिसांना यश आले.

याप्रकरणी पेट्रोल पंप व्यवस्थापक अक्षय जाधव यांनी दिलेल्या फिर्यादिवरुन रस्ता लुटप्रकरणी सलीम पठाण, शशिकांत साळुंके, रवीद्र लोखंडे विरुध्द सायंकाळी तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला.

सोमवारी (ता. २१) चितळी (ता. राहता) येथील बी. जे. पेट्रोल पंपाचे व्यवस्थापक अक्षय जाधव पेट्रोल पंपावरील जमा रक्कम बॅगेत घेऊन चितळी येथील बँकेत भरण्यासाठी नेहमीप्रमाणे दुचाकीवर निघाले. तेव्हा पाठीमागुन आलेल्या दुचाकीस्वार तीन चोरट्यांनी त्यांची अडवणुक करत धमकी देत त्यांच्याकडील पैशाची बॅग हिसकावुन पसार झाले.

दरम्यान, सदर प्रकाराची माहीती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस हवालदार शंकर चौधरी यांना मिळल्याने त्यांनी चोरट्यांचा पाठलाग करत तालुका पोलिसांच्या मदतीने सापळा रचुन जळगाव शिवारात सदर चोरट्यांना पकडण्यात यश आले. सदर घटनेची महिती मिळाल्यानंतर पोलिस उपाधिक्षक राहुल मदने, पोलिस निरीक्षक मसूद खान यांनी घटनास्थळी भेट देत माहिती घेतली. चोरट्यांना ताब्यात घेत पोलिसांनी एक लाख ६८ हजार रुपयांचा ऐवज हस्तगत केला. असुन तिघेंही चोरटे कोपरगाव येथील असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

संपादन : अशोक मुरुमकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Robbed a manager at a petrol pump in Shrirampur taluka