esakal | सुट्ट्या पैशांच्या बहाण्याने तो गंडवायचा दुकानदारांना
sakal

बोलून बातमी शोधा

Robbed shopkeepers in Parner taluka

गावातील आडबाजूचे, महिला दुकानदार असणारे किराणा दुकान शोधायचे, किराणा माल घेण्याच्या बहाण्याने जायचे व सुट्या पैशांची मागणी करायची. दुकानदाराने सुटे पैसे दिले, की फोनवर बोलण्याचे नाटक करीत तेथून पोबारा करायचा

सुट्ट्या पैशांच्या बहाण्याने तो गंडवायचा दुकानदारांना

sakal_logo
By
मार्तंड बुचुडे

पारनेर ः सुट्या पैशांच्या बहाण्याने किराणा दुकानदारांना गंडा घालणाऱ्या आरोपीस पारनेर पोलिसांनी अटक केली. संजय रावसाहेब कापरे ऊर्फ औटी, असे त्याचे नाव आहे. 

पारनेरसह कान्हूर पठार येथील दोघांना, तसेच सुपे परिसरातील वाळवणे, हंगे, पाडळी रांजणगाव व पिंपरी गवळी येथील किराणा दुकानदारांनाही त्याने अशाच प्रकारे गंडा घातला. पारनेरमधील किराणा दुकानदार मीराबाई पोपट खोडदे यांच्या दुकानातून मोबाईल घेऊन त्याने पोबारा केला. त्यानंतर खोडदे यांनी तक्रार केल्यावर पारनेर पोलिसांनी त्यास अटक केली. 

हेही वाचा - विखे पाटलांचा पुन्हा पवारांना टोमणा

गावातील आडबाजूचे, महिला दुकानदार असणारे किराणा दुकान शोधायचे, किराणा माल घेण्याच्या बहाण्याने जायचे व सुट्या पैशांची मागणी करायची. दुकानदाराने सुटे पैसे दिले, की फोनवर बोलण्याचे नाटक करीत तेथून पोबारा करायचा, असा प्रकार आरोपीकडून सुरू होता.

अशा प्रकारे त्याने पारनेरमधील दुकानदार महिलेला 10 हजार रुपयांना, तसेच वाळवणे, हंगे व पाडळी रांजणगाव येथील दुकानदारांनाही प्रत्येकी 10 हजार, पिंपरी गवळी येथील दुकानदारास आठ हजार रुपयांना गंडवले. कान्हूर पठार येथील दोन दुकानदारांनी अद्याप तक्रारी न दिल्याने त्यांची रक्कम समजू शकली नाही. 

संपादन - अशोक निंबाळकर

loading image
go to top