esakal | सलग दोन दरोडे टाकण्याच्या बेतात असलेल्या दरोडेखोरांच्या श्रीगोंदे पोलिसांनी आवळ्या मुसक्या
sakal

बोलून बातमी शोधा

Arrested

अहमदनगर : सराईत दरोडेखोरांच्या टोळीचा पोलिसांनी केला पर्दाफाश

sakal_logo
By
संजय काटे

श्रीगोंदे (जि. अहमदनगर) : कोळगाव येथे दरोडा टाकल्यानंतर देऊळगाव येथे त्याच रात्री दुसरा दरोडा तयारीत असणाऱ्या टोळीचा श्रीगोंदे पोलिसांनी पर्दाफाश केला. पाच आरोपी पकडले व तीन पळून गेले मात्र या सराईत टोळीकडून अनेक वेळा गुन्ह्यात वापरलेल्या वाहनासह पाच लाख तीस हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.

...असा होता घटनाक्रम

पोलिस निरीक्षक रामराव ढिकले यांनी दिलेल्या माहितीनुसार, कोळगाव येथील गॅस पाईपलाईन गोडावूनचा सुरक्षारक्षक मच्छिंद्र काळे याला आठ जणांनी दमदाटी मारहाण करून चार लाख ३७ हजार रुपयांचे साहित्यावर दरोडा टाकला. नंतर हेच आरोपी देऊळगाव येथील महामानव बाबा आमटे वसतिगृहाच्या समोरील रस्त्यावर दरोडा टाकण्याच्या उद्देशाने फिरत असल्याचे पोलिसांना समजले. ढिकले यांनी तातडीने पथक पाठवून यातील पाच जणांना मुद्देमालासह पकडण्यात यश मिळविले. या दोन्ही घटना गुरुवारी मध्यरात्री व आज शुक्रवार पहाटे या दरम्यान घडल्या. कोळगाव येथील दरोड्याच्या घटनेची फिर्याद मच्छिंद्र काळे याने बेलवंडी पोलिस ठाण्यात दिली तर दरोडा टाकण्याच्या तयारीत असणारे आरोपी पकडल्या प्रकरणीची फिर्याद पोलिस कॉन्स्टेबल किरण बोराडे यांनी दिली.

हेही वाचा: शरद पवार, नितीन गडकरी उद्या एकाच मंचावर

पोलिसांनी आरोपींकडून एक टाटा कंपनीचा पांढरा रंगाचा छोटा हत्ती त्याचा नंबर एम.एच.१७ बी.वाय. ६६९३, लाकडी ड्रम त्याला हिरवा, काळा, लाल रंगाचे केबल ,मिरचीपूड आदी साहित्य हस्तगत केले.

परमेश्वर उर्फ परमेश वैयशा भोसले (वय २५, भेंडाळा ता. गंगापुर, जि.औंरगाबाद), महेश रामकिसन धोत्रे (वय २१, प्रवारासंगम, ता. नेवासे, जि. अहमदनगर), राजु शिवाजी जाधव (वय २७, भेंडाळा ता.गंगापुर, जि.औंरगाबाद), सचिन अशोक जाधव (वय २४, प्रवारासंगम, ता. नेवासे, जि.अहमदनगर), मंगेश शेषराव गायकवाड (कुंटेफळ ता. जि. औंरगाबाद), संतोष अशोक जाधव (प्रवारासंगम ता. नेवासे), विठ्ठल भाऊसाहेब टरगळे (प्रवारासंगम ता. नेवासे), संभाजी शिवाजी जाधव (भेंडाळा ता.गंगापुर जि.औंरगाबाद) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला.

हेही वाचा: खंडणीसाठी विवाहितेचे अपहरण, केली ५ लाखांची मागणी

loading image
go to top