esakal | दरोडेखोरांच्या टोळीचा पोलिसांवर हल्ला; पाठलाग करून ठोकल्या बेड्या
sakal

बोलून बातमी शोधा

crime

दरोड्याच्या तयारीत असलेल्या टोळीचा पोलिसांवर हल्ला

sakal_logo
By
टीम-ईसकाळ

संगमनेर (जि. नगर) : तालुक्याच्या पठार भागातील माळवाडीत (बोटा) दरोडा घालण्याच्या तयारीत असलेल्या टोळीला आज (बुधवार) घारगाव पोलिसांनी पाठलाग करून जेरबंद केले. यावेळी दरोडेखोरांनी पोलिसांवर दगड व सत्तूरने हल्ला केला. त्याचा फायदा घेत पाचपैकी एक दरोडेखोर पळून जाण्यात यशस्वी झाला. दरोड्याच्या साहित्यासह ४० हजारांचा मुद्देमाल यावेळी जप्त करण्यात आला. (robbers who attacked the police were chased and caught by the police)

जानकू लिंबाजी दुधवडे, संजय निवृत्ती दुधवडे (दोघेही रा. गाढवलोळी, अकलापूर, ता. संगमनेर), दत्तू बुधा केदार (रा. नांदूर खंदरमाळवाडी), राजू सुरेश खंडागळे (रा. माळवाडी), अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. भाऊ लिंबाजी दुधवडे पसार झाला. घारगाव पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलिस निरीक्षक सुनील पाटील यांना माळवाडी परिसरात संशयास्पदरीत्या युवकांची टोळी फिरत असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर त्यांनी पहाटे साडेतीनच्या सुमारास पोलिस पथकाला माळवाडीकडे पाठविले.

हेही वाचा: Redmi चा पहिला 5G स्मार्टफोन भारतात लॉंच; जाणून घ्या किंमत

पोलिसांना पाहताच दरोडेखोर पळून जाऊ लागले. मात्र, पोलिसांनी पाठलाग करून चौघांना जेरबंद केले. दरोडेखोरांनी पोलिसांवर दगडफेक करून सत्तूरने हल्ला केला. या झटापटीत एक दरोडेखोर पळून जाण्यात यशस्वी झाला. पोलिस नाईक गणेश लोंढे यांच्या फिर्यादीवरून घारगाव पोलिस ठाण्यात पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई हवालदार संजय विखे, पोलिस नाईक गणेश लोंढे, पोलिस कॉन्स्टेबल किशोर लाड, हरिश्चंद्र बांडे, प्रमोद चव्हाण, संतोष फड यांच्या पथकाने केली.

(robbers who attacked the police were chased and caught by the police)

हेही वाचा: अहमदनगर जिल्हा परिषदेत बदल्या फक्त नावालाच!

loading image