esakal | दरोड्याच्या गुन्ह्यातील टोळीजेरबंद... केडगावच्या घटनेचा चोवीस तासांत तपास
sakal

बोलून बातमी शोधा

 Robbery gang arrested

सोलापूर-पुणे महामार्गावर दौंडजवळ 14 आरोपींना ताब्यात घेण्यात आले. त्यांच्याकडून दरोड्याच्या साहित्यासह दोन मोटारी जप्त करण्यात आल्या.

दरोड्याच्या गुन्ह्यातील टोळीजेरबंद... केडगावच्या घटनेचा चोवीस तासांत तपास

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नगर : केडगाव येथील एक्‍स झोन पार्किंगमध्ये सुरक्षारक्षकाला मारहाण करून मालट्रकसह तीन मोबाईल लंपास करणाऱ्या दरोडेखोरांच्या टोळीला पोलिसांनी अवघ्या चोवीस तासांत जेरबंद केले.

सोलापूर-पुणे महामार्गावर दौंडजवळ 14 आरोपींना ताब्यात घेण्यात आले. त्यांच्याकडून दरोड्याच्या साहित्यासह दोन मोटारी जप्त करण्यात आल्या. याबाबत कोतवाली पोलिस ठाण्यात दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

हेही वाचा - मुलगाच म्हणतो... अाईचे अनैतिक संबंध

प्रदीप प्रकाश शिंदे, जगदीश बाळासाहेब शिंदे, सागर बाळू सरगर, निखिल लहू वाळके, प्रदीप बाळासाहेब शिंदे (सर्व, रा. मेडशिंगी, ता. सांगोला, जि. सोलापूर), लखन धनाजी कांबळे, दीपक दगडू शिंदे, नवनाथ मुरलीधर खरकाळे (रा. अकोला, ता. सांगोला, जि. सोलापूर), अजित धोंडिराम मिसाळ (रा. चिनके, ता. सांगोला), नवनाथ रमेश पाटील (रा. ओलेगाव, ता. सांगोला), मनोहर शिवाजी सरपळे, सौरभ सुखदेव मोरे (रा. आंधळगाव, ता. मंगळवेढे), अजय सीताराम भोसले, हनुमंत मारुती गावडे (रा. वारेगाव, ता. सांगोला, जि. सोलापूर), अशी आरोपींची नावे आहेत. 

केडगाव येथील एक्‍स झोन पार्किंग यार्डमध्ये 28 जून रोजी पहाटे दोन मोटारींमधून आलेल्या वरील आरोपींनी गेटवरून चढून आत प्रवेश केला. सुरक्षारक्षकाला लाकडी दांडके, लोखंडी रॉडने मारहाण केली. त्याच्याकडून मोठ्या गेटची चावी घेऊन मालट्रक व तीन मोबाईल घेऊन ते पसार झाले. याबाबत सुनील विठ्ठल गोंडाळ यांच्या फिर्यादीवरून कोतवाली पोलिसांनी दरोड्याचा गुन्हा दाखल केला. 

घटनेची माहिती मिळताच पोलिस उपअधीक्षक संदीप मिटके, पोलिस निरीक्षक प्रवीण लोखंडे यांनी नाकाबंदीचे आदेश दिले. पोलिस उपनिरीक्षक सतीश शिरसाठ यांचे पथक आरोपींच्या शोधात पुण्याकडे रवाना झाले. केडगाव चौफुला, पुणे-वडगाव निंबाळकर रस्त्यावर मालट्रकचा पाठलाग करून चालकाला पकडले. पुढे मोटारीतून जाणाऱ्या आरोपींची माहिती घेतली. त्यांचा पाठलाग सुरू केला.

पुणे-सोलापूर महामार्गावर दौंड पोलिस ठाण्याच्या हद्दीत हॉटेल राजकमलसमोर दोन्ही मोटारी अडवून संशयितांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून दोन वाहनांसह 47 लाख 70 हजार 150 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. पोलिस कर्मचारी गणेश धोत्रे, शाहीद शेख, नितीन शिंदे, सुजय हिवाळे, भारत इंगळे, बापूसाहेब गोरे, प्रशांत राठोड यांच्या पथकाने ही कारवाई केली.