रोहित पवारांनी झेडपीत घेतली बैठक अन कुजबूज सुूरू झाली

Rohit Pawar held a meeting in Zilla Parishad
Rohit Pawar held a meeting in Zilla Parishad

नगर ः जिल्हा परिषदेच्या अखत्यारीतील कर्जत-जामखेड तालुक्‍यांतील प्रलंबित प्रश्‍नांबाबत अधिकाऱ्यांची बैठक घेऊन आमदार रोहित पवार यांनी आढावा घेतला. 

निवडक खातेप्रमुखांसह जिल्हा परिषद अध्यक्ष राजश्री घुले, उपाध्यक्ष प्रताप शेळके, महिला बालकल्याण समितीच्या सभापती मीरा शेटे उपस्थित होत्या. आमदार पवार यांनी विभागनिहाय मतदारसंघातील प्रश्‍न मांडले.

ते सोडविण्यास राज्य पातळीवर अडचण असल्यास, पालकमंत्री हसन मुश्रीफ यांना पत्राद्वारे ते कळवा व त्याची एक प्रत मला द्या. यासंदर्भात मंत्रालय व राज्य सरकारच्या पातळीवर पाठपुरावा करून ते सोडविण्यासाठी प्रयत्न केले जातील, असे पवार म्हणाले. 

कर्जत-जामखेड मतदारसंघात जिल्हा परिषदेची 180पेक्षा जास्त कर्मचाऱ्यांची पदे रिक्त असून, ती प्राधान्याने भरण्याची सूचना पवार यांनी केली. ग्रामपंचायतींमधील रिक्त ग्रामसेवकांच्या जागा भराव्यात, पाणीपुरवठा योजनांच्या अडचणी, मतदारसंघात नव्याने पशुवैद्यकीय दवाखाने सुरू करावेत, अशी सूचना पवार यांनी केली. 

साईबाबा संस्थानाचा सुमारे 10 महिन्यांपासून पडून असलेला प्राथमिक शाळाखोल्यांचा 10 कोटींचा निधी राज्य सरकारच्या सार्वजनिक बांधकाम विभागाकडून पुन्हा जिल्हा परिषदेच्या सार्वजनिक बांधकाम खात्यात वर्ग करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचेही पवार म्हणाले. 

पवार यांनी बैठक घेतल्याची जिल्हा परिषदेच्या तसेच राजकीय वर्तुळात चर्चा झडली. ही आढावा बैठक असली तरी अनेकांनी धास्ती घेतली आहे. काही ठिकाणी राजकीय कुजबूज सुरू झाली आहे. आगामी काळात याचे पडसाद उमटण्याची शक्यता आहे.

संपादन - अशोक निंबाळकर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com