रोटरीमुळे ऊसतोड कामगारांची दिवाळी गोड

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 14 November 2020

समनापूर ते संगमनेर साखर कारखाना रोडवरील ऊसतोडणी कामगारांच्या तात्पुरत्या वस्त्यांवरील पालांवर हा उपक्रम साजरा करण्यात आला.

संगमनेर ः दिवाळीसारख्या मोठ्या सणाच्या काळातही कुटूंबाच्या चरितार्थासाठी घरापासून दूर आलेल्या ऊस तोडणी मजूरांच्या कुटूंबातील 200 महिलांना दिवाळीमिनित्त साडी व किराणाची संगमनेर रोटरी क्‍लबतर्फे भेट देऊन त्यांची दिवाळी गोड केली. 

रोटरी श्रमशक्तीची भाऊबीज दिवाळी या प्रकल्पाद्वारे हा उपक्रम आयोजित केला होता. रोटरीचे प्रशिक्षक दीपक मणियार, अध्यक्ष पवनकुमार वर्मा, प्रकल्प प्रमुख नरेन्द्र चांडक यांच्या संकल्पनेतुन व माजी उपप्रांतपाल सुनील कडलग, सुनील घुले यांच्या पुढाकारातून हा प्रकल्प साकारला.

त्याला प्रथितयश व्यवसायिक राजपाल व राजेंद्र क्‍लाथ स्टोअर्स आणि रोटरी सदस्यांनी मोलाची साथ दिली. यासाठी उपप्रकल्पप्रमुख सोनू राजपाल, ओंकार सोमाणी, सुदीप वाकळे, संजय कर्पे, रमेश दिवटे, मधुसूदन करवा, महेश वाकचौरे, डॉ. सुजय कानवडे यांनी पुढाकार घेतला. 

समनापूर ते संगमनेर साखर कारखाना रोडवरील ऊसतोडणी कामगारांच्या तात्पुरत्या वस्त्यांवरील पालांवर हा उपक्रम साजरा करण्यात आला. प्रकल्प यशस्वीतेसाठी प्रकल्प समितीचे सदस्य डॉ. प्रमोद राजुस्कर, अजित काकडे, विश्वनाथ मालाणी, सम्राट तवरेज, मयूर मेहता, ऋषीकेश मोंढे यांनी परिश्रम घेतले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Rotary makes Diwali sweet for sugarcane workers