सरकार संविधान बदलणार या केवळ अफवा - मंत्री रामदास आठवले

 Ramdas Athawale
Ramdas Athawaleesakal

अकोले (जि. अहमदनगर) : राजूर मध्ये माजी मंत्री मधुकर पिचड (Madhukar Pichad) यांच्या निवासस्थानी केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांचे जोरदार स्वागत करण्यात आले.

यावेळी मंत्री रामदास आठवले (Ramdas Athawale) यांनी कविता म्हणत भाषणाला सुरुवात केली.

ज्यावेळी २००९ ला शिर्डी मतदारसंघात होतो

त्यावेळी नव्हती आलेली आमची आंधी

मग कसा होईल मी खासदार नी मंत्री...

मला आनंद आहे ज्यांनी अकोले तालुक्यात गाजविला होता अनेक वर्षे गड

त्यांचे नाव आहे मधुकर पिचड...

बाबासाहेबांच्या संविधानाला मी हात लावू देणार नाही

भाजप व मित्र पक्ष पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या नेतृत्वाखाली काम करीत आहे. सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास या पद्धतीने काम चालू आहे. सरकारआदिवासी मागासवर्गीय आरक्षणाला पाठिंबा देणारे आहे. काही लोक राजकीय आकसापोटी सरकार संविधान बदलणार आहे. आरक्षण बदलणार आहे अश्या अफवा पसरवत आहेत मात्र जोपर्यंत मी सरकारमध्ये आहे तोपर्यंत बाबासाहेबांच्या (Dr Babasaheb Ambedkar) संविधानाला मी हात लावू देणार नाही. त्यामुळे आदिवासी मागासवर्गीयांचे आरक्षण बदलण्याचा प्रश्नच येत नाही. असे उद्गार केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांनी राजूर येथे बोलताना काढले.

 Ramdas Athawale
Ahmednagar : सणासुदीत लॉकडाउन उठवावे

आमचे सरकार असताना मागणी केली असती तर प्रश्न सुटला असता

लोकशाहीत जय- पराजय असतो व पराजय पचविण्याची ताकद असली पाहिजे. मधुकर पिचड अनेक वर्षे मंत्री मंडळात होते; त्यांनी आदिवासी विकास विभागात अविस्मरणीय काम केले. ते शरद पवार यांच्या अगदी जवळ होते. मीही जवळ होतो. आणि आज आम्ही दोघेही त्यांच्यापासून लांब आहोत. पंतप्रधान देशाचे नव्हे तर आंतरराष्ट्रीय पातळीवर उल्लेखनीय काम करत आहेत. याचा आम्हाला अभिमान आहे. भंडारदरा जलाशय होताना अनेक आदिवासी विस्थापित झाले. त्यांचे पुनर्वसन होण्याऐवजी त्यांच्या जमिनी महाराष्ट्र सरकार आपल्या नावे करून त्यांना इतर हक्कात टाकत असेल तर आपण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना भेटून हा प्रश्न व विल्सन डॅम चे नाव बदलून क्रांतिवीर राघोजी भांगरे यांचे नाव देण्यासाठी आपण आग्रही राहू. तुम्ही आमचे सरकार होते तेव्हा मागणी केली असती तर प्रश्न सुटला असता; मात्र सरकार कुणाचेही असो हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी मी व माझा पक्ष तुमच्या सोबत व पुढे असेल. रस्त्यासाठी निधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन त्यांनी यावेळी दिले.

 Ramdas Athawale
एकीकडे नवरात्रीत स्त्रीशक्ती जागर, दुसरीकडे नगरची 'ही' घटना

विविध संघटना, भाजप, रिपब्लिकन, आदिवासी विकास परिषद, सरपंच परिषदेने त्यांचे पुष्पहार शाल, गुच्छ देऊन सत्कार केला. तर प्रकल्पग्रस्त आदिवासी शेतकऱ्यांनी महाराष्ट्र सरकारने आदिवासींना इतर हक्कात टाकू नये, भंडारदरा जलाशयाचे नाव क्रांतिवीर राघोजी भांगरे नाव द्यावे, रस्ते इत्यादीचे निवेदन दिले. स्वागत वकील वसंत मनकर, प्रास्तविक भाजपचे ज्येष्ठ नेते शिवाजी धुमाळ यांनी केले. यावेळी भाजपचे तालुका अध्यक्ष सीताराम भांगरे, गटनेते जालिंदर वाकचौरे, सोनाली नाईकवाडी, सभापती उर्मिला राऊत, दत्ता देशमुख, यशवंत अभाले, काशिनाथ साबळे, गणपत देशमुख, सी.बी.भांगरे, विजय वाकचौरे, शांताराम संगारे, चंद्रकांत सरोदे, गौतम पवार, उपस्थित होते. सूत्रसंचलन भास्कर एलमामे आभार संतोष बनसोडे यांनी मानले.सोबत फोटो.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com