esakal | Sangamner | मुलीवरील अत्याचाराचा खटला ‘फास्ट ट्रॅक’मध्ये चालवा : रुपाली चाकणकर
sakal

बोलून बातमी शोधा

rupali chakanakar

मुलीवरील अत्याचाराचा खटला ‘फास्ट ट्रॅक’मध्ये चालवा : रुपाली चाकणकर

sakal_logo
By
आनंद गायकवाड

संगमनेर (जि. अहमदनगर) : विकृतीचा नायनाट करण्याची आवश्यकता आहे, अन्यथा अशा घटना वारंवार घडण्याची शक्यता असल्याचे प्रतिपादन करताना.. स्वतःच्या पोटच्या गोळ्यावर लैंगिक अत्याचार करणाऱ्या विकृताला पाहिल्यावर तळपायाची आग मस्तकात जात असल्याची तीव्र प्रतिक्रीया राष्ट्रवादी महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी व्यक्त केली.

गुरुवार ( ता. 30 ) रोजी रात्री उशिरा संगमनेर येथील भेटी दरम्यान त्यांनी संगमनेर शहर पोलिस ठाण्यात जावून, साडेअकरा वर्ष वयाच्या मुलीवर झालेल्या अत्याचार प्रकरणाची माहिती पोलिस निरीक्षक मुकूंद देशमुख यांच्याकडून घेतली. त्यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना ही प्रतिक्रीया व्यक्त केली.

हेही वाचा: अतिवृष्टीने नुकसान झालेल्या भागांचे त्वरित पंचनामे करा - भारती पवार

त्या म्हणाल्या, या खटल्याचे कामकाज फास्ट ट्रॅक कोर्टात चालवण्याची मागणी राष्ट्रवादी महिला काँग्रेस करीत आहे. त्या अभागी मुलीला लवकर न्याय मिळाला तरच अशा विकृत प्रवृत्तीला जरब बसेल. हे कायद्याचे राज्य आहे, पोलिस त्यांचे काम चोख करताहेत याचे समाधान आहे. मात्र ज्या वेळी बापाला मुलीचं नातं समजत नसेल अशा घटनांच्या वेळी सर्व समाजघटकांनी एकत्र येवून अशा प्रवृत्तीचा नाश कऱण्याची गरज आहे. एखादी घटना घडल्यानंतर कँडल मार्च, चर्चा, आंदोलने केली जातात. मात्र अशी एखादी घटना घडून गेल्यानंतर काय हा प्रश्न अनुत्तरीत राहत असल्याकडे लक्ष्य वेधून यासाठी समाज प्रबोधनाची आवश्यकता असल्याचे मत व्यक्त केले. या वेळी त्यांच्या समवेत राष्ट्रवादीचे नगर जिल्हा सरचिटणीस सचिन मुजगुले होते.

हेही वाचा: 'मुक्‍त'तर्फे विद्यार्थ्यांना घरपोहोच मिळणार मायग्रेशन सर्टिफिकेट

loading image
go to top