

Rupali Chakankar addressing supporters in Kopargaon, expressing full confidence of victory in the upcoming municipal elections.
Sakal
कोपरगाव : उपमुख्यमंत्री अजित पवार हे फुले, शाहू, आंबेडकरांचा विचार पुढे घेवून मार्गक्रमण करीत आहेत. समाजातील प्रत्येक घटकाला न्याय देण्याचे काम त्यांनी केले. विधानसभेला भरपावसातील सभेला कोपरगावकरांनी उपस्थित राहून आमदार आशुतोष काळे यांना भरभरून प्रेम दिले. पालिका निवडणुकीसाठी आमचे येणे केवळ औपचारिकता आहे. विरोधक कितीही कुरघोड्या करो. येत्या तीन तारखेला खांद्यावर गुलाल घेतल्याशिवाय राहणार नाही, असा विश्वास राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी व्यक्त केला.