Ahilyanagar News:'...अन्‌ आईच्या कुशीत शिवाय सुखरूप'; वडिलांच्या आठवणीने व्याकूळ, पुण्याला जाण्यासाठी सायकलवरून कामरगावपर्यंत प्रवास

Heart-Touching Story: प्रवासी वाहन मात्र थांबत नव्हते. दुसऱ्या बाजूला घरातील एकुलता एक मुलगा सापडत नसल्याने आई धायमोकलून रडत होती. सगळीकडे फिरत होती. अखेर अंधारात महामार्गावर चुकलेल्या लहानग्याला सामाजिक कार्यकर्त्यांच्या आधारामुळे पुन्हा त्याच्या आईकडे सुपूर्द करता आले.
Boy cycles from Kamaragaon to Pune, longing for his late father but safe in the embrace of his mother.
Boy cycles from Kamaragaon to Pune, longing for his late father but safe in the embrace of his mother.Sakal
Updated on

.नगर तालुका : वडिलांच्या आठवणीने व्याकुळ आठ वर्षांचा चिमुकला छोट्याशा सायकलवर नगरहून थेट पुण्याला निघाला. नगर-पुणे महामार्गावरील चास-कामरगावच्या घाटात तो थकला. माझ्या सायकलला दोर बांधून मला पुण्याला माझ्या वडिलांना भेटायला घेऊन चला, अशी वाहनचालकांना तो विनवणी करत होता. प्रवासी वाहन मात्र थांबत नव्हते. दुसऱ्या बाजूला घरातील एकुलता एक मुलगा सापडत नसल्याने आई धायमोकलून रडत होती. सगळीकडे फिरत होती. अखेर अंधारात महामार्गावर चुकलेल्या लहानग्याला सामाजिक कार्यकर्त्यांच्या आधारामुळे पुन्हा त्याच्या आईकडे सुपूर्द करता आले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com