शिर्डी बंदचा निर्णय मागे; विखे पाटलांची मध्यस्थी आली कामी

Sai Baba Palkhi which has been closed till today has been resumed on Thursday.jpg
Sai Baba Palkhi which has been closed till today has been resumed on Thursday.jpg

शिर्डी (अहमदनगर) : साईसंस्थानचे कार्यकारी अधिकारी कान्हूराज बगाटे यांनी ग्रामस्थांच्या सर्व मागण्या मान्य केल्या. तसेच आजवर बंद ठेवण्यात आलेली साईबाबांची दर गुरुवारची पालखी आजपासून सुरू करण्याची तयारी त्यांनी दर्शविली. आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या उपस्थितीत ग्रामस्थ व बगाटे यांच्यात झालेल्या चर्चेत, या मागण्या मान्य करण्यात आल्या. त्यामुळे येत्या शनिवारी देण्यात आलेला 'शिर्डी बंद'चा इशारा तूर्त स्थगित करण्यात आला, अशी माहिती माजी नगराध्यक्ष कैलास कोते यांनी दिली. 

कोते म्हणाले, की या बैठकीस नगराध्यक्ष शिवाजी गोंदकर, डॉ. एकनाथ गोंदकर, माजी नगराध्यक्ष कैलास कोते, अभय शेळके, प्रमोद गोंदकर, सचिन शिंदे आदी उपस्थित होते. त्यापूर्वी आमदार विखे पाटील व बगाटे यांच्यात स्वतंत्र चर्चा झाली. ग्रामस्थांच्या शिष्टमंडळाच्या उपस्थितीत सर्व मागण्या मान्य झाल्याने, शनिवारचा 'बंद' तूर्त स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला.

बगाटे यांनी दिलेल्या आश्‍वासनाची पूर्ती केली, तर ग्रामस्थांना सुलभपणे साईदर्शन घेता येईल. साईमंदिर परिसराचे तीन व चार क्रमांकाचे दरवाजे खुले होतील. भाविकांसोबतचे ज्येष्ठ नागरिक व लहान मुलांचे हाल थांबतील. लिखापढी करून मंदिर परिसरात प्रवेश करण्याची जाचक अट मागे घेतली जाईल. पूर्वेकडील ओस पडलेल्या बाजारपेठेला काही प्रमाणात यामुळे जीवदान मिळेल.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com