प्रार्थना बेहरेची साईंनी ऐकली प्रार्थना, म्हणून करते शिर्डीत बर्थ डे

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 6 January 2021

"मितवा' हिट झाला, अभिनेत्री म्हणून ओळख निर्माण झाली. ही किमया साईबाबांमुळे घडली.

शिर्डी ः "मितवा' प्रदर्शित होण्यापूर्वी त्याच्या चित्रफितीची साई समाधीवर पूजा करण्यासाठी येथे आले होते. त्यावेळी मला कुणी अभिनेत्री म्हणून ओळखलेही नव्हते.

"मितवा' हिट झाला, अभिनेत्री म्हणून ओळख निर्माण झाली. ही किमया साईबाबांमुळे घडली. तेव्हापासून माझा वाढदिवस शिर्डीत साजरा करते, अशा शब्दांत मराठी सिनेअभिनेत्री प्रार्थना बेहेरे हिने भावना व्यक्त केल्या. 

हेही वाचा - औरंगाबादचे झाले संभाजीनगर, मनसेचे धाडस

कोविडचे सावट असतानाही, तिने साईनगरीत वाढदिवस साजरा करण्याची परंपरा कायम ठेवली. येथील हॉटेल उद्योजक दिलीप वाकचौरे व त्यांच्या सहकाऱ्यांनी या सर्वांचे स्वागत केले.

प्रार्थना म्हणाली, की नव्या वर्षाची सुरवात आणि वाढदिवस शिर्डीत साजरा करायला आवडते. कोविडमुळे सर्वांना काळजी वाटत होती. साईदर्शन घेताना एरवीची गडबड, गोंगाट नसल्याने शांतपणे दर्शन घेता आले. त्यामुळे पती अभिषेक यांच्यासह कुटुंबातील सर्वांनाच आनंद वाटला. अहमदनगर

संपादन - अशोक निंबाळकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sai heard the prayers of actress Behre