
Doctors at Sai Sansthan Hospital successfully perform brain surgery on twin sisters, removing tumors safely.
Sakal
शर्डी: जुळ्या बहिणी, दोघींच्याही मेंदू जवळ एकाच ठिकाणी, एकाच आकाराच्या गाठी तयार झाल्याचे वैद्यकीय तपासणीत निष्पन्न झाले. साई संस्थान रुग्णालयातील न्यूरोसर्जन डाॅ. मुकुंद चौधरी यांनी एकाच दिवशी या दोन्ही बहिणींच्या मेंदूवर काही दिवसांच्या अंतराने एकापाठोपाठ एक यशस्वी शस्त्रक्रिया करून या गाठी काढल्या. वैद्यकीय विश्वातील हा दुर्मीळ योगायोग साई संस्थान रुग्णालयातील वर्तुळात चर्चेचा विषय ठरला.