Shirdi News : साईरामला आता कायमचा राम राम...

सशुल्क दर्शन पास व्यवस्थेत सुलभता अन् उत्पन्नात तिपटीने वाढ
Shirdi Ahmadnagar News
Shirdi Ahmadnagar News

शिर्डी : धनिक भाविकांना साईदर्शन घडवून घेतल्या जाणाऱ्या लाभप्राप्तीला साईंच्या नगरीत साईराम, असे संबोधले जाते. साईसंस्थानच्या व्यवस्थापनाने सशुल्क दर्शन पास सर्वांसाठी खुले केले. जनसंपर्क विभागाने व्यवस्थित नियोजन केले. गर्दी वाढल्याने या आर्थिक वर्षात सशुल्क दर्शनातून साईसंस्थानला मिळणारे

उत्पन्न तिप्पट झाले. साईराम करणाऱ्यांना चाप लागला. त्यातून साईरामला आता राम राम, असे चित्र निर्माण झाले. साईसंस्थान प्रशासनाकडे संपर्क साधल्यानंतर मिळालेल्या माहितीनुसार, मागील अर्थिक वर्षात सुमारे अकरा लाख भाविकांनी सशुल्क दर्शन घेतले. त्यापोटी साईसंस्थानला तेवीस कोटी रुपयांचे उत्पन्न मिळाले.

यंदा वर्षभरात सव्वीस लाख भाविकांनी सशुल्क दर्शन घेतले. त्यापोटी साईसंस्थानला एकसष्ट कोटी रुपये उत्पन्न मिळाले. रेल्वे प्रवाशांसाठी एक हजार दर्शनपासचा कोटा दिला. आता वंदेभारत एक्स्प्रेससाठी देखील कोटा दिला जाईल. रेल्वेस्थानकावर सशुल्क दर्शन पास कक्ष सुरू केला जाईल. रेल्वे प्रवासाचे आरक्षण करतानाच दर्शन पासची लिंक भाविकांकडे जाते.

त्याद्वारे दर्शन पास मिळवता येतो. साईसंस्थानच्या सर्व धर्मशाळा आणि विमानतळांवर देखील अशी व्यवस्था पूर्वीपासूनच आहे. साईसंस्थानच्या तदर्थ समितीचे अध्यक्ष आणि जिल्हा प्रधान न्यायाधीश सुधाकर यार्लगड्डा तसेच साईसंस्थानचे कार्यकारी अधिकारी राहुल जाधव यांनी या व्यवस्थेत सुसूत्रता आणली. जनसंपर्क विभागाचे प्रशासकीय अधिकारी आकाश किसवे यांनी या व्यवस्थेचे व्यवस्थित नियोजन केले.

सशुल्क दर्शन पास मिळविण्यासाठी मध्यस्थाची गरज संपली. त्यातून साईरामला आळा बसण्यास मोठी मदत झाली. शिफारशीने येणाऱ्या महत्त्वाच्या व्यक्तींना टोकण क्रमांक देऊन पहिल्या क्रमांकाच्या दरवाजाने मंदिर परिसात प्रवेश दिला जातो. शिफारस करणाऱ्याचे नाव नोंदले जाते. वारंवार शिफारशी आल्यास त्याकडे त्याचे लक्ष वेधले जाते.

Shirdi Ahmadnagar News
Anganwadi workers : अंगणवाडी सेविकांसाठी मोठी बातमी; मानधनात २० टक्क्यांनी वाढ

त्यामुळे शिफारस करणारा देखील जपून शिफारस करतो. जनसंपर्क अधिकारी तुषार शेळके म्हणाले की, देणगीदारांना आणि महत्त्वाच्या व्यक्तींना व्यवस्थित दर्शन मिळेल, यासाठी आम्ही विशेष काळजी घेतो. सशुल्क दर्शन पास व्यवस्था सर्वांसाठी खुली असल्याने सामान्य भाविकांना देखील तिचा सहजतेने लाभ मिळतो. भाविकांच्या त्याबाबत चांगल्या प्रतिक्रिया येत आहेत.

सशुल्क दर्शन व्यवस्थेत आता सुसूत्रता आल्याने इच्छुक सर्व भाविकांना सहजतेने या व्यवस्थेचा लाभ घेता येतो. महत्त्वाच्या व्यक्तींसाठी आणि देगणीदारांसाठी स्वतंत्र व्यवस्था केली. त्यामुळे या व्यवस्थेतील त्रुटी दूर होण्यास मदत झाली.

- राहुल जाधव, कार्यकारी अधिकारी, साईसंस्थान, शिर्डी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com