Parner News : ‘सकाळ’-कंट्री क्रॉप्समध्ये सामंजस्य करार; शेतकऱ्यांना ट्रॅक्टरचे वितरण

‘सकाळ’ मीडिया व कंट्री क्रॉप्स यामध्ये व्यावसायिक सामंजस्य करार झाला आहे. याचा प्रारंभ आमदार रोहित पवार यांच्या हस्ते निघोज बुधवारी (ता. १५) शेतकऱ्यांना २५ ट्रॅक्टरचे वितरण करून होत आहे.
Rohit Pawar
Rohit PawarSakal

पारनेर - ‘सकाळ’ मीडिया व कंट्री क्रॉप्स यामध्ये व्यावसायिक सामंजस्य करार झाला आहे. याचा प्रारंभ आमदार रोहित पवार यांच्या हस्ते निघोज बुधवारी (ता. १५) शेतकऱ्यांना २५ ट्रॅक्टरचे वितरण करून होत आहे. कंट्री क्रॉप्समुळे शेतकऱ्यांना अत्याधुनिक कृषी यंत्रासह सर्व प्रकारचे साहित्य किफायतशीर किमतीत मिळणार आहे, अशी माहिती कृषी उद्योजक व ‘कंट्री क्रॉप्सचे संचालक संकेत लाळगे यांनी दिली.

लाळगे म्हणाले की, बुधवारी पवार यांच्या व नगर ‘सकाळ’चे सह्योगी संपादक प्रकाश पाटील, कन्हैया उद्योगाचे संस्थापक अध्यक्ष शांताराम लंके यांच्या हस्ते व माजी साखर आयुक्त शेखर गायकवाड यांच्या उपस्थितीत होते. निघोज येथे मळगंगा मंदिरासमोर ट्रॅक्टरचे वितरण होत आहे. या वेळी कन्हैया उद्योगाचे सर्वेसर्वा मच्छिंद्र लंके, कन्हैया अॅग्रोचे सीईओ सुरेश पठारे सुजित झावरे, रविकांत वरपे आदी उपस्थित राहणार आहेत.

या पुढील काळात शेतकऱ्यांना मातीत रुजणाऱ्या बियाण्यापासून, तर थेट तयार झालेला माल निर्यात होईपर्यंत लागणारी प्रत्येक गोष्ट कंट्री क्रॉप्स या एकाच हक्काच्या छताखाली उपलब्ध होणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचा मोठा फायदा होणार आहे. या कंट्री क्रॉप्स योजनेंतर्गत शेतकऱ्यांना ट्रॅक्टर, कृषी यंत्रे तयार मालासाठी बाजारपेठ, कृषी सोलर, अत्याधुनिक तंत्रज्ञान, तसेच विविध शासकीय योजनांची माहिती मिळणार आहे.

शेती हा भारतातील अनेक कुटुंबांचा वर्षानुवर्षे शेती हा परंपरागत कौटुंबिक व्यवसाय आहे. असे असले तरीही शेतकऱ्यांना विविध आव्हानांचा सामना करावा लागतो. शेतीत आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रवेश, पिकांच्या किमतीतील चढ-उतार व दिवसेंदिवस जमिनीचे होणारे तुकडे या समस्यांना तोंड द्यावे लागत आहे.

शेतकरी करत असलेली परंपरागत शेती त्यातून त्यांना बाहेर काढून शेतकऱ्यांची उत्पादकता आणि उत्पन्न वाढविण्यासाठी कृषी क्षेत्राचे आधुनिकीकरण व सुधारणा करण्याचे प्रयत्न आम्ही करत आहोत, असेही लाळगे यांनी सांगितले.

कंट्री क्रॉप्सच्या अधिक माहितीसाठी खालील वेबसाईटला भेट द्यावी. www.countrycrops.co.in

स्वस्तात कृषी यंत्रे मिळणार

‘सकाळ’ मीडिया व कंट्री क्रॉप्स यामध्ये व्यावसायिक सामंजस्य करार झाला. ज्यामुळे शेतकऱ्यांना कृषी यंत्रे रास्त किमतीमध्ये उपलब्ध होतील. करारप्रसंगी सकाळ माध्यम समूहाचे सीईओ उदय जाधव, कंट्री क्रॉप्सचे संस्थापक संकेत लाळगे, विवेक लंके व चार्टर्ड अकाउंटंट अनमोल शिंदे व सरव्यवस्थापक रमेश बोडके उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com