पोलिसांनी जप्त करायला दिलेल्या गो-मांसाची महापालिका कर्मचाऱ्यांकडून परस्पर विक्री

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 22 November 2020

जप्त केलेले गो-मांस कोतवाली पोलिसांनी महापालिका कर्मचाऱ्यांकडे नष्ट करण्यासाठी दिले होते.

अहमदनगर : शहरात जप्त केलेले गो-मांस कोतवाली पोलिसांनी महापालिका कर्मचाऱ्यांकडे नष्ट करण्यासाठी दिले होते. मात्र, नष्ट करण्याऐवजी महापालिका कर्मचाऱ्यांनी त्याची परस्पर विक्री केली. याबाबत कोतवाली पोलिसांनी महापालिका कर्मचाऱ्यांसह सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, चौघांना अटक केली आहे. 

नगर जिल्ह्यातील बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
कबीरखान बाहीदखान हकीम (रा. बुरुडगाव रस्ता), फुलचंद मोहन बनसोडे (रा. सारसनगर), मंटुगुमार काशिनाथ गोंड (रा. सारसनगर), कमलकांत निखिलेश रॉय (रा. सारसनगर), फैजान कुरेशी, शोएब कुरेशी (दोन्ही रा. झेंडी गेट), जियारान कुरेशी (रा. पिंपरी, जि. पुणे) व दोन अनोळखी व्यक्तींचा आरोपींमध्ये समावेश आहे. 

याबाबत सुशील विजय वाघेला (वय 36) यांनी फिर्याद दिली. त्यानुसार, कोतवाली पोलिसांनी गुरुवारी (ता. 19) सायंकाळी पाच वाजता बुरुडगाव डंपिंग ग्राउंड येथून गो-वंशाच्या जनावरांचे मांस जप्त केले होते. नष्ट करण्यासाठी ते महापालिकेकडे सुपूर्द केले. मात्र, नष्ट करण्याऐवजी कर्मचाऱ्यांनी त्याची परस्पर विक्री केली. हा प्रकार लक्षात आल्यावर तोफखाना पोलिस ठाण्यात सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. नगर तालुका पोलिस ठाण्यात तो वर्ग केला आहे. 

संपादन : अशोक मुरुमकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sale of mutton for confiscation in Ahmednagar by Municipal Corporation employees