esakal | अतिरिक्त शिक्षकांना मुख्यमंत्री ठाकरे सरकारचा दिलासा; पटसंख्या कमी झाली तरी त्याच शाळेत संधी
sakal

बोलून बातमी शोधा

Same school should be given to the teachers who have reduced the count of students in primary and secondary schools

संच मान्यतेनुसार प्राथमिक व माध्यामिक शाळेत यावर्षी विद्यार्थी संख्येअभावी एखादा शिक्षक अतिरिक्त होत असेल तर त्या शाळेला व त्या शिक्षकास या शैक्षणिक वर्षासाठी विद्यार्थी संख्या वाढीसाठी संधी देण्यात येणार आहे.

अतिरिक्त शिक्षकांना मुख्यमंत्री ठाकरे सरकारचा दिलासा; पटसंख्या कमी झाली तरी त्याच शाळेत संधी

sakal_logo
By
मार्तंड बुचुडे

पारनेर (अहमदनगर) : संच मान्यतेनुसार प्राथमिक व माध्यामिक शाळेत यावर्षी विद्यार्थी संख्येअभावी एखादा शिक्षक अतिरिक्त होत असेल तर त्या शाळेला व त्या शिक्षकास या शैक्षणिक वर्षासाठी विद्यार्थी संख्या वाढीसाठी संधी देण्यात येणार आहे.

त्याने शाळेतील विद्य़ार्थी संख्या वाढविली तर त्या शिक्षकास त्याच शाळेत राहाण्याची संधी मिळणार आहे. अन्यथा त्याची पुढील  शैक्षणिक वर्षात बदली होणार आहे. त्यामुळे कमी पटसंख्या असलेल्या शिक्षकांना किमान या शैक्षणिक वर्षासाठी का होईना संरक्षण मिळणार आहे.

हेही वाचा : २६ मार्चला निकाल अन्‌ १ एप्रिलला नोकरी; १९५२ मधील एका शिक्षकाची रंजक कहाणी
शिक्षण विभागाच्या वतीने नुकतेच एक परीपत्रक काढले असून या परिपत्रकामुळे शिक्षकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे. बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार कायदा 2009 नुसार शिक्षण क्षेत्रात मोठा बदल करण्यात आला होता. त्या परिपत्रकानुसार पाचवीचे वर्ग नजिकच्या एक किलोमिटरच्या खाजगी किंवा स्थानिक स्वराज्य संस्थेच्या शाळेस जोडावेत, असेही म्हटले आहे.

गेल्यावर्षी शैक्षणिक वर्षात संच मान्यता झाल्याच नाहीत. त्यामुळे दोन वर्षापुर्वीचीच संच मान्यता ग्राह्य धरण्यात येणार आहेत. ती पदे कायम ठेवण्यात येणार असून या शैक्षणिक वर्षात (2020- 21)  संच मान्यतेतजर एखादा शिक्षक अतिरिक्त होत असेल तर त्यांना यावर्षी विद्यार्थी संख्या वाढीसाठी संधी देण्यात येऊन त्यांना त्याच शाळेत या शैक्षणक वर्षासाठी तरी राहाण्याची संधी देण्यात येणार आहे.

नगर जिल्ह्यातील बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
माध्यामिक शाळांसाठी कार्य़भारानुसार कला, क्रीडा व कार्यानुभव असे स्वतंत्र विशेष शिक्षक नेमणुकीस मान्यता देण्यात येणार आहेत. हा विशेष शिक्षक विद्य़ार्थी संखेअभावी जर अतिरिक्त झाला तरीही त्यास अतिरिक्त ठरविता येणार नाही असेही परिपत्रकात म्हटले आहे. तसेच मुख्याध्यापक, उपमुख्याध्यापक तसेच पर्यवेक्षक यांच्या पदाच्या निकषात मात्र कोणताही बदल करण्यात आलेला नाही.

कोणत्याही खाजगी संस्थेला आपला वर्ग चालविण्यासाठी किमान 15 विद्यार्थी  संखेची अट आहे. मात्र ज्या शाळेत प्राथमिक सह उच्च माध्यमिकचे वर्ग  जोडलेली आहेत तेथे मात्र 20 विद्यार्थी संखेची अट घालण्यात आली आहे. व खाजगी माध्यमिक शाळेसाठी मात्र ही अट 25 विद्यार्थी संखेची करण्यात आली आहे. अशा प्रकारे एखादी शाळा विद्य़ार्थी संखेची अट पुर्ण करत नसेल व या पेक्षा विद्यार्थी संख्या कमी झाली असेल तरीही त्या खाजगी व्यवस्थापनास स्वयंअर्थ साह्यअंतर्गत शाळा चालवावयाची असेल तर त्या व्यवस्थापनास दोन वर्षासाठी शाळा चालविण्यास परवाणगी देण्यात येणार आहे. अशा प्रकारचे शिक्षण विभागाच्या वतीने नुकतेच एका परिपत्रकानुसार जाहीर करण्यात आले आहे.

संपादन : अशोक मुरुमकर