

Water Revolution in Sangamner
Sakal
-राजू नरवडे
संगमनेर: मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत संगमनेर तालुक्यात ग्रामविकासात अभूतपूर्व अशी घोडदौड सुरू झाली आहे. गटविकास अधिकारी प्रवीण सिनारे यांच्या मार्गदर्शनाखाली अवघ्या आठ दिवसांच्या अल्पावधीत श्रमदानाच्या जोरावर तब्बल १९२ वनराई बंधाऱ्यांची निर्मिती करण्यात आली आहे. या उपक्रमामुळे जलसंधारण, भूजलस्तरवाढ, रब्बी हंगामातील पाण्याची उपलब्धता आणि शेतीसाठी आवश्यक पाण्याचा स्थिर पुरवठा यांना मोठी चालना मिळणार आहे.