अहिल्यानगर : संगमनेरचे शिवसेना आमदार अमोल खताळ (Amol Khatal) यांच्यावर झालेल्या हल्ल्याप्रकरणी प्रसाद गुंजाळ (Prasad Gunjal) या तरुणाला पोलिसांनी अटक केली आहे. या घटनेमागे राजकीय षडयंत्र असल्याचा आरोप आमदार खताळ समर्थकांनी केला असून त्यांनी मोर्चा काढला होता. मात्र, आता आरोपी प्रसाद गुंजाळची आई अनिता गुंजाळ यांनी केलेल्या धक्कादायक आरोपांमुळे नव्या चर्चांना उधाण आले आहे.