
-राजू नरवडे
संगमनेर: राज्य परिवहन महामंडळाच्या संगमनेर बसस्थानकात दोन वर्षात तब्बल चार प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. या घटना एसटी कर्मचाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे घडल्या आहेत. अशा घटना पुन्हा घडू नये, यासाठी एसटी प्रशासनाने आता उपाययोजना कराव्यात, अशी मागणी होत आहे.