esakal | संगमनेर: जिल्ह्यात घुलेवाडी लसीकरणात अग्रस्थानी
sakal

बोलून बातमी शोधा

Corona Vaccination

संगमनेर: जिल्ह्यात घुलेवाडी लसीकरणात अग्रस्थानी

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

संगमनेर: तालुक्यातील घुलेवाडी या संगमनेर शहरानजीकच्या गावांत कमीत कमी मनुष्यबळात जास्तीत जास्त लसीकरणाचा उपक्रम यशस्वीपणे राबविण्यात आला. यासाठी जिल्हा परिषदेचे घुलेवाडी आरोग्य उपकेंद्र, निमोण आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी, आशा स्वयंसेविका व पर्यवेक्षक आदींनी सहकार्य केले.

हेही वाचा: लोणी: तीन वर्षांपासून फरार असलेला आरोपी अखेर जेरबंद

जिल्हा परिषद सदस्य सीताराम राऊत म्हणाले की, घुलेवाडीतील आरोग्य उपकेंद्रात गुरुवार (ता.९) रोजी ५०० तर, पावबाकी येथे ४२७ अशा ९२७ लाभार्थ्यांना एकाच दिवशी कोविड लसीकरण करण्यात आले. यासाठी घुलेवाडीतील समाजभान असलेले युवा कार्यकर्ते, तसेच सरपंच, उपसरपंच व ग्रामपंचायतीच्या सदस्यांनी योगदान दिले. +

महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली, घुलेवाडी येथील ग्रामीण रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्राच्या माध्यमातून व तेथील कर्मचारी वर्गाच्या सक्रिय सहभागातून घुलेवाडी जिल्ह्यात कोविड लसीकरणाच्या बाबतीत अग्रस्थानी असल्याचे समाधान आहे.

loading image
go to top