
संगमनेर:लाडकी बहिण योजना आम्ही सुरु केली. काही लोकांचे हफ्ते मागेपुढे झाले असतील. ज्या योजना आम्ही सुरू केल्या, त्या बंद होणार नाहीत. आम्ही दिलेला शब्द पाळणारे आहोत. आम्ही जाहीरनाम्यात शेतकऱ्यांना कर्जमाफीचा शब्द दिला आहे. सध्या आमची थोडी तारेवारची कसरत सुरु आहे. मात्र शेतकऱ्यांना कर्जमाफी देणारच, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.