Ahmednagar News : संगमनेर उपकारागृहातून चार कैदी पळाले; 4 सुरक्षारक्षक निलंबित

पोलिसांचा ढिसाळ कारभार चव्हाट्यावर
sangamner sub jail 4 prisoners escape 4 police suspended ahmednagar news
sangamner sub jail 4 prisoners escape 4 police suspended ahmednagar newsSakal

Ahmednagar News : संगमनेर शहर पोलिस ठाण्याला लागून असलेल्या उपकारागृहाचे गज कापून चार सराईत आरोपींनी बुधवारी पहाटे (ता.८) धूम ठोकल्याच्या घटनेने खळबळ उडाली. कारागृहातील कर्मचारी साखरझोपेत असताना एकाच वेळी चार कैद्यांनी पलायन केल्याने संगमनेर शहर पोलिसांच्या कामगिरीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. याप्रकरणी पोलिस अधीक्षकांनी ड्यूटीवरील चार सुरक्षाकारक्षकांना निलंबीत करण्याचे आदेश काढले आहेत.

संगमनेर पोलिस ठाण्यालगत असलेल्या उपकारागृहात शहरासह संगमनेर तालुका, घारगाव व आश्र्वी येथील आरोपींना ठेवले जाते. कारागृहातील तीन नंबर बराकीमध्ये राहुल देविदास काळे, रोशन रमेश ददेल, अनिल छबू ढोले, मच्छिंद्र मनाजी जाधव हे चार कैदी न्यायालयीन कोठडीत होते.

अतिशय नियोजनबद्ध पद्धतीने चारही आरोपींनी पळून जाण्याचा कट रचला व पहाटेच्या सुमारास पलायन केले. बुधवारी सकाळी साडेसात वाजता हा प्रकार सुरक्षारक्षकांच्या निर्दशनास आल्याने खळबळ उडाली. पलायन करणारे चारही आरोपी सराईत असून गंभीर गुन्ह्यांमध्ये न्यायालयीन कोठडीत होते.

एका कैद्यावर खुनाचा गुन्हा दाखल असून दोघांवर अत्याचाराचा, तर चौथ्या कैद्यावर खुनाचा प्रयत्न करणे, असे गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. घटनेची माहिती मिळताच पोलिस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे, कारागृह अधीक्षक तथा तहसीलदार धीरज मांजरे, पोलिस निरीक्षक भगवान मथुरे यांनी घटनास्थळी धाव घेतली होती.

त्यानंतर घटनेची माहिती अपर पोलिस अधीक्षक स्वाती भोर यांना देण्यात आली. त्याही घटनास्थळी दाखल झाल्या होत्या. याप्रकरणी पोलिस हेड कॉन्स्टेबल आनंद धनवट यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल केला आहे.

दरम्यान, यापूर्वीही अशाच पद्धतीने कैदी पळून गेले होते. आता कैदी पळून जाण्याची ही दुसरी घटना आहे. वारंवार कैदी पळून जाण्याच्या घटना घडत असतानाही पोलिस यातून काहीच बोध घेत नसल्याने पोलिसांच्या कामगिरीवर आश्र्चर्य व्यक्त होत आहे.

दरम्यान, स्थानिक गुन्हे शाखेची दोन व संगमनेर शहर पोलिसांची दोन अशी चार पथके आरोपींच्या शोधासाठी रवाना झाली आहेत. चारही आरोपी कारागृहापासून सुमारे दोनशे फुटांवर आधीच येऊ थांबलेल्या एका कारमधून पळून गेल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली. सीसीटीव्ही फुटेजमध्ये एका कारमधून आरोपी पळून गेल्याचे पोलिसांनी सांगितले.

पोलिस अधिकाऱ्यांकडून सारवासारव

कैदी बराकीचे गज कापून गेल्याची प्रक्रिया एका दिवसात झालेली नाही. गेल्या काही दिवसांपासून हा कट शिजत होता. गज कापण्यासाठी वापरलेले हत्यार त्यांना कोणी पुरविले, हाही प्रश्न आहे. दरम्यान, बराकीमध्ये असलेल्या कूलरच्या आवाजाचा फायदा घेऊन आरोपींनी गज कापले असावेत व नंतर पळून गेल्याची शक्यता असल्याचे पोलिस अधिकाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे.

कैद्यांच्या बराकीमध्ये मोठे कुलर आहेत. कूलरच्या आवाजाचा फायदा घेऊन आरोपींनी गज कापल्याची शक्यता आहे. आरोपींच्या शोधासाठी तत्काळ चार पथके रवाना झाली आहेत.

-सोमनाथ वाघचौरे, पोलिस उपअधीक्षक.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com