esakal | संगमनेर : पत्नीच्या नाजूक संबंधामुळे पतीची सासुरवाडीत आत्महत्या
sakal

बोलून बातमी शोधा

Hanging

संगमनेर : पत्नीच्या नाजूक संबंधामुळे पतीची सासुरवाडीत आत्महत्या

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

संगमनेर : एक वर्ष वयाचा मुलगा असतानाही पत्नीचे माहेरी असलेले नाजूक संबंध तिच्या प्रियकराने सोशल मिडीयावर पुराव्यासह पाठवल्याने, झालेल्या वादातून, नाशिक जिल्ह्यातील एका गावातील व्यक्तीने संगमनेर तालुक्यातील सासुरवाडीत येवून विष प्राशन केले. आठवडाभर मृत्यूशी झुंज देत त्याने अखेरचा श्वास घेतला. याप्रकरणी संगमनेर तालुका पोलिस ठाण्यात प्रियकरासह पाच जणांविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल झाला आहे.

पतीच्या मोबाईलवर एका दुखावलेल्या प्रियकराने तिच्याशी असलेल्या संबंधाची कबुली चॅटिंग व व्हिडिओ क्लिपच्या पुराव्यासह व्हॉटसअॅपवर पाठवल्याने पत्नीविषयी त्याच्या मनात द्वेष निर्माण झाला. याचा जाब विचारण्यासाठी गेलेल्या पतीवरच आरोप करीत तिने घटस्फोटाची मागणी केली.

हेही वाचा: सुसंस्कृत पुण्यात लाजिरवाणी घटना; अल्पवयीन मुलीवर सामुहिक बलात्कार

अखेर पत्नी व तिला पाठीशी घालणाऱ्या पालकांना कंटाळून त्याने नुकतेच मध्यरात्री सासुरवाडीत जाऊन, विषारी औषध प्राशन केले. त्याला बेशुध्दावस्थेत संगमनेर येथील एका खासगी रुग्णालयात व नंतर घोटी येथील रुग्णालयात उपचारार्थ हलविण्यात आले. नुकतेच त्याचे निधन झाले. या प्रकरणी त्याच्या भावाने दिलेल्या फिर्यादीवरुन तालुका पोलिसांनी पत्नी, तिचे आई, वडील, भाऊ व मोबाईल धारक अशा पाच जणांवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.

loading image
go to top