esakal | महसूल मंत्र्याच्या तालुक्यात कोरोनाचे १४ मृत्यू; रुग्ण संख्या झाली २३२
sakal

बोलून बातमी शोधा

In Sangamner taluka 232 coronavirus patients and 14 died

संगमनेर येथे कोरोना बाधितांची संख्या 232 झाली असून तर कोरोनाच्या चौदाव्या रुग्णाचा मृत्यू झाला आहे. रविवारी रात्री उशिरा प्रशासनाला प्राप्त झालेल्या अहवालानुसार 232 जणांना कोरोनाची बाधा झाल्याची बाब समोर आली.

महसूल मंत्र्याच्या तालुक्यात कोरोनाचे १४ मृत्यू; रुग्ण संख्या झाली २३२

sakal_logo
By
आनंद गायकवाड

संगमनेर (अहमदनगर) : येथे कोरोना बाधितांची संख्या 232 झाली असून तर कोरोनाच्या चौदाव्या रुग्णाचा मृत्यू झाला आहे. रविवारी रात्री उशिरा प्रशासनाला प्राप्त झालेल्या अहवालानुसार 232 जणांना कोरोनाची बाधा झाल्याची बाब समोर आली. तरीही, संगमनेरकरांच्या वर्तनामध्ये सुधारणा होण्याची चिन्हे दिसत नाहीत. लॉकडाऊनमधून मिळालेल्या शिथीलतेचा गैरफायदा घेत, शहरातील गर्दी दिवसेंदिवस वाढतच आहे. आज पहाटे कासारवाडीत आढळलेल्या 63 वर्षाच्या रुग्णाचा जिल्हा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यु झाला आहे. संगमनेरात कोविडचे 80 सक्रीय रुग्ण असून त्यांच्यावर शासकीय व खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
रविवारी सायंकाळी आलेल्या अहवालात संगमनेर शहरातील मालदाड रोड येथे 51 वर्षीय पुरुष व 53 वर्षीय महिला, जनतानगर येथे 24 वर्षीय तरुण, रहेमतनगर येथे 38 वर्षीय पुरुष, अरगडे गल्ली येथे 41 वर्षीय पुरुष, विद्यानगर येथील 66 वर्षीय महिला, ऑरेंज कॉर्नर येथील 63 वर्षीय महिला, भारत नगर येथील 40 वर्षीय पुरुष तर तालुक्यातील निमोण येथील 56 वर्षीय पुरुष व धांदरफळ येथील 35 वर्षीय पुरुष असे एकूण 10 रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. यामुळे तालुक्याची रुग्णसंख्या 232 वर पोचली आहे. आज पहाटे 3 जुलै रोजी बाधीत आढळलेल्या कासारवाडीतील या रुग्णावर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरु होते. रात्री प्रकृती जास्त खालावल्याने आज पहाटे त्यांचा मृत्यू झाला.

संपादन : अशोक मुरुमकर

loading image