संगमनेर : विखे गटाचे पारडे जड

आश्‍वी बुद्रुक सेवा संस्थेची निवडणूक अटीतटीची
विखे गटाचे पारडे जड
विखे गटाचे पारडे जडesakal

संगमनेर : आश्‍वी बुद्रुक सेवा संस्थेच्या १३ जागांसाठी झालेल्या अटीतटीच्या निवडणुकीत सत्ताधारी विखे गटाला जबरदस्त टक्कर देत अमरेश्वर ग्रामविकास मंडळाने सहा जागा जिंकल्या, तर एका जागेसाठी दोन्ही उमेदवारांना समान मते पडल्याने चिठ्ठी टाकून झालेल्या निर्णयानंतर विजयाचे पारडे विखे प्रणित जनसेवा मंडळाकडे झुकले.

संगमनेर तालुक्यातील आश्वी बुद्रुक हे गाव प्रशासकीयदृष्ट्या संगमनेर तालुक्याला, तर विधानसभेसाठी शिर्डी मतदारसंघाला जोडले गेल्याने, या सीमेवरील गावांमधील स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी थोरात व विखे या पारंपरिक दिग्गजांमधील सत्तासंघर्ष सातत्याने सुरू असतो. मागील पंचवार्षिक निवडणुकीत आश्‍वी बुद्रुक सेवा संस्थेवर आमदार राधाकृष्ण विखे पाटील गटाचे वर्चस्व होते, तर ग्रामपंचायत थोरात गटाच्या ताब्यात आहे. विखेंची यंत्रणा येथे असल्याने एकतर्फी निकाल लागण्याची शक्यता वर्तवली जात होती, तर ग्रामपंचायतीचे पदाधिकारी व तुटपुंज्या कार्यकर्त्यांच्या बळावर महसूलमंत्री बाळासाहेब थोरात प्रणित अमरेश्वर मंडळाने विजयाची पराकाष्ठा केली. मतमोजणीनंतर एका जागेसाठी दोन्ही उमेदवारांना प्रत्येकी ४१० मते मिळाल्याने, चिठ्ठी टाकून कौल घेण्यात आला. त्यात जनसेवाचे नवनाथ किसन खेमनर यांना विजयी घोषित करण्यात आल्याने अमरेश्वरचे सहा, तर जनसेवाचे सात उमेदवार होवून सत्तेचे पारडे अवघ्या एका जागेने विखे गटाकडे झुकले.

सर्वसाधारण प्रवर्गातून दशरथ खेमनर, मच्छिंद्र गायकवाड, अण्णासाहेब जऱ्हाड, मच्छिंद्र ताजणे, तुळशिराम निघुते, ब्रिजमोहन बिहाणी, कैलास मुळे हे विजयी झाले. नवनाथ खेमनर व कारभारी म्हसे या दोघांना समान मते मिळाली. चिठ्ठीद्वारे खेमनर यांना विजयी घोषीत करण्यात आले. वैशाली जऱ्हाड, पार्वताबाई होडगर, नामदेव शिंदे, ज्ञानेश्वर ताजणे, बाबूराव जऱ्हाड हे विजयी झाले आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com