
तळेगाव दिघे : संगमनेर तालुक्यातील पारेगाव खुर्द येथे दोन कुत्र्यांचे भांडण झाले. मालकाने दुसऱ्या कुत्र्यावर कुऱ्हाडीने वार करून गंभीर जखमी केल्याने त्याच्या मालकीणीने दिलेल्या फिर्यादीवरून संगमनेर पोलिसांनी एकावर गुन्हा दाखल केला आहे. ही घटना शुक्रवारी ( ता. २२ ) सायंकाळी ५.३० वाजेच्या सुमारास घडली.