esakal | संगमनेरची वाहतूक शाखा दंड वसुलीत अव्वल
sakal

बोलून बातमी शोधा

Sangamner's transport branch tops in fine collection

आंतरजिल्हा प्रवेशबंदी असताना, विनापरवाना सुरू असलेल्या छुप्या वाहतुकीवर कारवाईसाठी नांदूर शिंगोटे, आळे खिंड, देवठाण येथे चौक्‍या उभारण्यात आल्या होत्या. शहरातील जास्त रहदारीच्या भागांतही कारवाई करण्यात आली.

संगमनेरची वाहतूक शाखा दंड वसुलीत अव्वल

sakal_logo
By
आनंद गायकवाड

संगमनेर ः संगमनेरच्या जिल्हा वाहतूक शाखेने कोविड संकटकाळात विविध कलमांतर्गत केलेली कारवाई व दंडवसुलीत जिल्ह्यात अव्वल स्थान पटकावले आहे. 
वाहतूक शाखेचे सहायक पोलिस निरीक्षक पी. वाय. कादरी यांच्या पथकाने आजपर्यंत 11 हजार जणांवर ई-चलन, जिल्हाबंदी, विनामास्क, वाहनाची कागदपत्रे नसणे, वाहनपरवाना, विना हेल्मेट व ट्रिपल सीट आदींच्या उल्लंघनाबद्दल सुमारे 23 लाख रुपये दंडात्मक कारवाई केली, तसेच 700 वाहने जप्त केली.

ई-पासची सक्ती बंद झाल्यानंतर आता शहरात कारवाई सुरू झाली आहे. केवळ पाच मशिनच्या साहाय्याने वाहतूक शाखेने केलेले वरील काम जिल्ह्यात अव्वल असल्याची माहिती कादरी यांनी दिली. 

हेही वाचा - मद्यधुंद डंपरचालकाने दोघांना चिरडले

कोरोचा सामना करण्यासाठी प्रशासनाने दळणवळण व संचारासह विविध प्रकारचे निर्बंध लागू केले होते. त्याअंतर्गत संचारबंदी व लॉकडाउनच्या काळात होणारी वाहतूक रोखण्यासाठी संगमनेरमधील जिल्हा वाहतूक शाखा पोलिसांच्या मदतीला सरसावली होती. एक अधिकारी व दोन महिला कर्मचाऱ्यांसह 18 कर्मचाऱ्यांच्या वाहतूक शाखेने पाच महिन्यांच्या काळात कौतुकास्पद कामगिरी बजावली.

आंतरजिल्हा प्रवेशबंदी असताना, विनापरवाना सुरू असलेल्या छुप्या वाहतुकीवर कारवाईसाठी नांदूर शिंगोटे, आळे खिंड, देवठाण येथे चौक्‍या उभारण्यात आल्या होत्या. शहरातील जास्त रहदारीच्या भागांतही कारवाई करण्यात आली. 

संपादन - अशोक निंबाळकर

loading image
go to top