
अहिल्यानगर : उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे स्वयंघोषित नेते खासदार संजय राऊत स्वतःचा टीआरपी वाढवण्यासाठी वादग्रस्त विधान करतात. ज्यांचे हात भ्रष्टाचाराने बरबटलेले आहेत, ज्यांनी ईडीचा प्रसाद घेत अनेक महिने जेलमध्ये काढले आहेत, त्यांनी खोटे आरोप करू नयेत, अशा आरोपांना भीक न घालता अहिल्यानगरचा विकास हा असाच वेगाने चालू ठेवणार आहे, प्रसंगी अशांना जशास तसे उत्तर देऊ, अशा शब्दांत आमदार संग्राम जगताप यांनी सडेतोड उत्तराने विरोधकांचा समाचार घेतला.