esakal | डॉ. आ. ह. साळुंके पुरस्कार नगरच्या डॉ. संजय बोरूडेंना जाहीर
sakal

बोलून बातमी शोधा

Sanjay Borude to A.H. Salunke Award announced

संघाच्या वतीने प्रसिद्ध इतिहासकार डॉ.आ. ह. साळुंखे यांच्या नावाचा प्रतिभा पुरस्कार यंदापासून सुरू केला आहे. पहिलाच पुरस्कार नगरला मिळाला आहे. गेली अनेक वर्षे साहित्यसेवेचे कार्य हा साहित्यसंघ करीत आहे. 

डॉ. आ. ह. साळुंके पुरस्कार नगरच्या डॉ. संजय बोरूडेंना जाहीर

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नगर : येथील साहित्यिक डॉ. संजय बोरुडे यांना परतवाडा येथील डॉ. आ. ह. साळुंखे ' प्रतिभा ' पुरस्कार जाहीर झाला आहे. सदर पुरस्कार त्यांच्या साहित्यिक व इतिहास अभ्यासातील योगदानामुळे दिला जात आहे.

प्रसिध्द कवी डॉ. विठ्ठल वाघ, विठ्ठल कुलट आणि अन्य कवींनी स्थापन केलेल्या 'प्रतिभा साहित्य संघा'च्या वतीने अनेक उपक्रम सतत सुरू असतात. सदर संघाच्या कार्याला २५ वर्षांहून जास्त दिवस झाले. या संस्थेने कवी अनिल पाटील, रवींद्र महल्ले, विजय सोसे, गजानन मते यांसारखे कवी महाराष्ट्राला दिले आहेत.

हेही वाचा - जुन्या कांद्याची एक हजाराने झाली घसरण

संघाच्या वतीने प्रसिद्ध इतिहासकार डॉ.आ. ह. साळुंखे यांच्या नावाचा प्रतिभा पुरस्कार यंदापासून सुरू केला आहे. पहिलाच पुरस्कार नगरला मिळाला आहे. गेली अनेक वर्षे साहित्यसेवेचे कार्य हा साहित्यसंघ करीत आहे. 

डॉ. संजय बोरुडे हे मराठी, हिंदी व इंग्रजी या तिन्ही भाषेत लेखन करतात. आजपर्यंत त्यांची १५ पुस्तके प्रकाशित आहेत. विद्यापीठांच्या अभ्यासक्रमातही त्यांच्या लेखनाचा समावेश आहे. जगप्रसिध्द अशा पेंग्विन प्रकाशनाने त्यांचा THE HYMN OF LEAVES हा इंग्रजी कवितासंग्रह प्रकाशित केला आहे. त्यांच्या या यशामुळे साहित्य वर्तुळातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

विदर्भामध्ये एक विशेष मानाचे स्थान आणि दर्जा सांभाळून आहे.' अशा साहित्य संघाकडून दिला जाणारा पहिलाच पुरस्कार, तोही प्रसिध्द इतिहासकार डॉ.आ. ह. साळुंखे यांच्या नावाचा हा पहिलाच प्रतिभा पुरस्कार जाहीर झाल्याने माझी जबाबदारी अधिक वाढली आहे आणि माझ्या लिखाणाला बळ मिळाले.

डॉ. संजय बोरुडे, अहमदनगर.

loading image