
कळमकर म्हणाले, 'गुरुकुलने महिलांचा सन्मान केला. त्यांच्या विचाराचा आदर करून त्यांना व्यक्त व्हायला संधी दिली. गुणवत्तेबाबतीत महिला नेहमी आग्रही असतात. राजकारणात महिलांचा जास्तीत जास्त सहभागाने संघटना गुणवत्तापूर्ण कार्यक्रमांकडे वळतील.
अहमदनगर : गुरुकुल मंडळ महिलांच्या कर्तृत्वाला वाव देईल. बॅंकेच्या अर्थकारणात महिला महत्त्वाची भूमिका बजावू शकतात, असे प्रतिपादन शिक्षक समितीचे सांस्कृतिक समितीचे राज्य अध्यक्ष डॉ. संजय कळमकर यांनी केले.
अहमदनगरच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
नगर तालुका शिक्षक समिती, गुरुकुल मंडळ, सांस्कृतिक समिती, महिला आघाडी शाखांच्या त्रैवार्षिक अधिवेशनात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी सीताराम सावंत होते. राज्य उपाध्यक्ष रा. या. औटी, संजय धामणे, नितीन काकडे, सुदर्शन शिंदे, भास्कर नरसाळे, अंकुश बेलोटे, आशा फणसे, सुनिता काटकर, राजेंद्र पटेकर, प्रल्हाद साळुंके, शिवाजी रायकर, अशोक कुटे, आत्माराम धामणे आदी उपस्थित होते.
ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
कळमकर म्हणाले, 'गुरुकुलने महिलांचा सन्मान केला. त्यांच्या विचाराचा आदर करून त्यांना व्यक्त व्हायला संधी दिली. गुणवत्तेबाबतीत महिला नेहमी आग्रही असतात. राजकारणात महिलांचा जास्तीत जास्त सहभागाने संघटना गुणवत्तापूर्ण कार्यक्रमांकडे वळतील. पुढील तीन वर्षासाठी गुरुकुल, समिती व इतर पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली. गुरुकुल मंडळात सूर्यभान काळे, प्रमिला खडके, महादेव गर्जे, राजेंद्र खडके यांनी प्रवेश केला.