
संगमनेर: सहकार, ग्रामीण विकास, दूध व्यवसाय, कृषी क्षेत्र, शिक्षण आणि निळवंडे धरणाच्या माध्यमातून तालुक्यात आर्थिक व सामाजिक समृद्धी निर्माण करण्याचे काम माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले आहे. राज्यातील सहकाराच्या पायाभरणीपासून ते शेतकऱ्यांच्या प्रश्नांपर्यंत सातत्याने लढा देणारे आणि जनतेच्या मनात कायमचे स्थान निर्माण करणारे असे थोरातांसारखे नेतृत्व दुर्मिळ आहे, अशा शब्दांत खासदार संजय राऊत यांनी थोरात यांच्या कार्याचा गौरव केला.