
-विनायक दरंदले
सोनई : साधूसंत येती घरा तोच दिवाळी दसरा याचा प्रत्यय आज गोणेगाव चौफुला येथील रामकृष्ण वारकरी आश्रमात आला. रामकृष्ण महाराज काळे यांचा पदस्पर्श लाभलेल्या भूमीला पाऊल लागावे म्हणून शंभरहून अधिक साधू-संत व महंतांनी सत्संग व संतभोजन कार्यक्रमास भेट दिली. स्नेहभोजनाच्या निमित्ताने जुळलेला आध्यात्मिक विचारांचा स्नेह उपस्थित भक्तांना आत्मिक पर्वणी देणारा ठरला आहे.