esakal | संत निळोबाराय एसटीने निघाले पंढरीला
sakal

बोलून बातमी शोधा

Sant Nilobaraya's Wari ST left for Pandhari

संत निळोबाराय हे महाराष्ट्रातील प्रमुख पाच संतांपैकी एक अाहेत. यंदाच्या वारीमध्ये निळोबारायांच्या पालखीचा नववा क्रमांक मिळाला.

संत निळोबाराय एसटीने निघाले पंढरीला

sakal_logo
By
एकनाथ भालेकर

राळेगणसिद्धी :- महाराष्ट्रातील पाच प्रमुख संतांपैकी एक असलेले संत निळोबाराय महाराज यांच्या पादुकांचे पादुकांचे प्रस्थान पंढपूरकडे झाले. सर्व नियमांचे पालन करीत मोजक्याच 20 वारकऱ्यांच्या समवेत पिंपळनेरहून पंढरपूरकडे हरिनामाचा व विठुरायाचा जयघोष करीत शिवशाही एसटी बसने आज सकाळी 11 वाजता प्रस्थान झाले.

प्रस्थानाच्या अगोदर श्री संत निळोबराय महाराज यांच्या समाधीची व पादुकांची पूजा आमदार नीलेश लंके, पोलिस उपअधीक्षक अजित पाटील, तहसीलदार ज्योती देवरे, अशोक सावंत, सुरेश पठारे यांच्या हस्ते झाली.

या वेळी निळोबाराय देवस्थान अध्यक्ष ज्ञानदेव पठारे, कार्याध्यक्ष अशोक सावंत, निळोबाराय वंशज व पालखी सोहळाप्रमुख गोपाळ मकाशीर, सुरेश पठारे, लक्ष्मण खामकर, चांगदेव शिर्के, भाऊसाहेब लंटाबळे, हभप विकासानंद मिसाळ महाराज, राजेंद्र पठारे, संपत सावंत, उपजिल्हाधिकारी सुधाकर भोसले, तहसीलदार ज्योती देवरे, पोलीस निरीक्षक राजेश गवळी, उपनिरीक्षक विजय बोत्रे, सभापती प्रशांत गायकवाड, गंगाराम बेलकर, पोलिस निरिक्षक राजेंद्र भोसले, पोलिस उपनिरिक्षक पुंडलिक पावसे, माजी सरपंच जयसिंग मापारी, दत्ता आवारी, सुभाष पठारे आदी उपस्थित होते.

हेही वाचा - साहेब काही तरी करा, मोदींचे पैसे येईनात

संत निळोबाराय हे महाराष्ट्रातील प्रमुख पाच संतांपैकी एक अाहेत. यंदाच्या वारीमध्ये निळोबारायांच्या पालखीचा नववा क्रमांक मिळाला. पालखी सोहळ्यास मान मिळविण्यासाठी खूप मोठा संघर्ष करावा लागला असे सकाळशी बोलताना निळोबाराय संस्थानचे कार्याध्यक्ष अशोक सावंत म्हणाले.

माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, आमदार नीलेश लंके यांचे पंढरपूरच्या पांडुरंगाच्या दरबारात निळोबारायांना मानाचे स्थान मिळवून देण्यासाठी मोलाचे सहकार्य लाभले. 

ते पुढे म्हणाले की, देवस्थानच्या वतीने वारीसाठी जाणाऱ्या सर्व वारकऱ्यांना कोरोना प्रतिबंधक N 95 मास्क, सॅनिटायझर, सर्व वारीला जाणाऱ्या 20 लोकांच्या कोरोनाच्या चाचण्या करून घेतल्या व सर्व वारकऱ्यांच्या चाचण्याही निगेटिव्ह आल्या आहेत.

कोरोना संसर्गजन्य आजाराच्या पार्श्वभूमीवर एक वेळ टाळ व मृदुंग विसरा पण सॅनिटायझर व मास्कला विसरू नका असे आवाहन तहसिलदार ज्योती देवरे यांनी वारीसाठी जाणाऱ्या वारकऱ्यांना आपल्या मार्गदर्शनात म्हणाल्या. त्याच गोष्टी या आजारात आपले संरक्षण करणार आहेत. यावेळी त्यांनी अभंग म्हणून वारीला जाणाऱ्या वारकऱ्यांचा व उपस्थित भाविकांचा उत्साह वाढविला.

आषाढी एकादशी व कोरोना पार्श्वभूमीवर पिंपळनेर येथे आषाढी एकादशीनिमित्त लाखो भाविक येत असतात. मात्र या वर्षीच्या आषाढीला भाविकांनी येऊ नये असे आवाहन संस्थानचे कार्याध्यक्ष अशोक सावंत यांनी केले आहे. तसेच पोलिस प्रशासनाच्या वतीनेही पिंपळनेरला येणाऱ्या सर्व रस्ते अडविले जाणार आहेत. त्यामुळे कुणीही पिंपळनेरला येऊ नये असे आवाहन पारनेरचे पोलिस निरिक्षक राजेंद्र गवळी यांनी केले आहे.

कोरोना संसर्गजन्य आजारामुळे विकास कामांना खीळ बसली आहे. मात्र, पुढील काळात संत निळोबारायांच्या देवस्थानाला राज्यात कशा प्रकारे नाव लौकिक मिळवून देता येईल. यासाठी मी प्रयत्न करणार असल्याचे आपल्या मनोगतात सांगितले. तसेच अधिकाधिक निधी मिळवून देऊन या देवस्थानचा विकास करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
 - नीलेश लंके - आमदार, पारनेर-नगर.