
कर्जत: कधी काळी वाड्यासमोर लांबच्या लांब बैलांची दावण बांधली जायची. मात्र, काळाच्या ओघात शेतीचे यांत्रिकीकरण झाले आणि कामासाठी शिवारातील शेतकऱ्यांचा सवंगडी अर्थात बैलजोडी पर्यायाने पशुधन कमी झाले. सध्या तर तालुक्यात जिल्ह्यात सर्वाधिक असणाऱ्या बैलांची संख्या हाताच्या बोटावर मोजता येईल इतकी उरली आहे.