esakal | पाथर्डी तालुक्यात पथदिवे, पाणीयोजनेचे 21 कोटी थकले
sakal

बोलून बातमी शोधा

MSEDCL

पाथर्डी तालुक्यात पथदिवे, पाणीयोजनेचे 21 कोटी थकले

sakal_logo
By
राजेंद्र सावंत

पाथर्डी (जि. अहमदनगर) : तालुक्यातील एकशे सात ग्रामपंचायतींकडे पथदिव्यांच्या वीजबिलाची १९ कोटी ३९ लाख रुपयांची थकबाकी आहे. तसेच, पाणीपुरवठा वीजबिलापोटीही दीड कोटी रुपयांची थकबाकी आहे. मात्र, ही थकबाकी चौदाव्या वित्त आयोगातील रकमेतून भरण्यास या गावांतील सरपंचांनी विरोध दर्शविला आहे. त्यामुळे थकबाकी भरण्याचे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे. (Sarpanch-decline-to-pay-payment-of-MSEDCL-Ahmednagar-marathi-news)

ग्रामपंचायतीने स्वनिधीतून रक्कम भरणे अपेक्षित

तालुक्यातील एकशे सात ग्रामपंचायतींकडे चौदा लाखांपासून ते ४३ लाखांपर्यंत वीजबिलाची थकीत रक्कम आहे. वेळोवेळी आवाहन करूनही थकीत रक्कम या ग्रामपंचायतींनी भरलेली नाही. ग्रामपंचायतीने स्वनिधीतून ही रक्कम भरणे अपेक्षित आहे. मिरी ग्रामपंचायतीने साठ हजार रुपये व आणखी पाच ते सहा ग्रामपंचायतींनी काही रक्कम भरली आहे. राज्य सरकारनेही पंधराव्या वित्त आयोगातून वीजबिल भरावे, असे आवाहन केले आहे. अनेक गावांतील सरपंच व लोकप्रतिनिधींनी याला विरोध केला आहे. त्यामुळे शासनानेही माघार घेतली आहे. विकासकामांसाठीचा निधी वीजबिल भरण्यासाठी वापरला, तर मग निधी कसा पुरेल, असा प्रश्‍न त्यांच्याकडून विचारला जात आहे.

हेही वाचा: सरकारला वाटते कोरोना संपला! म्हणूनच की काय लावला बदल्यांचा खेळ?

ग्रामपंचायती- १०७

पथदिवे थकबाकी- १९ कोटी ३९ लाख

पाणीपुरवठा थकबाकी- एक कोटी ५० लाख

अनेक ग्रामपंचायतींकडे पाणीपुरवठा योजनेचे दीड कोटी रुपयांचे वीजबिल थकीत आहे. पथदिव्यांचे व पाणीयोजनेचे थकीत वीजबिल भरण्यासाठी महावितरणने पथदिव्यांचा, तसेच पाणीपुरवठा योजनांचा वीजपुरवठाही खंडित केला होता. मात्र, नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी तो पूर्ववत करण्यात आला. संबंधित ग्रामपंचायतींनी थकीत वीजबिल भरावे, असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.

हेही वाचा: नगर जिल्ह्यात १३३ गावांमध्ये दीड वर्षांनी वाजली शाळेची घंटा

निधी बिल भरण्यातच गेला, तर विकास कसा करायचा?

''एकशे सात ग्रामपंचायतींकडे पथदिव्यांच्या वीजबिलाची १९ कोटी ३९ लाख रुपये थकबाकी आहे. वित्त आयोगाच्या रकमेतून काही ग्रामपंचायतींनी बिले भरली आहेत. इतरही ग्रामपंचायतींनी वीजबिल भरून सहकार्य करावे.'' - सुनील अहिरे, सहायक अभियंता, महावितरण

''थकबाकीची रक्कम मोठी आहे. छोट्या ग्रामपंचायतींना वित्त आयोगाचा निधी पाच ते सहा लाख रुपये येतो. पंधरा व सोळा लाख रुपये बिल कसे भरणार? पाच वर्षांचा निधी बिल भरण्यातच गेला, तर विकास करायचा कसा?'' - बापूसाहेब गोरे, सरपंच, धारवाडी

(Sarpanch-decline-to-pay-payment-of-MSEDCL-Ahmednagar-marathi-news)

loading image