esakal | नगर जिल्ह्यात १३३ गावांमध्ये दीड वर्षांनी वाजली शाळेची घंटा
sakal

बोलून बातमी शोधा

school

नगर जिल्ह्यात १३३ गावांमध्ये दीड वर्षांनी वाजली शाळेची घंटा

sakal_logo
By
टीम ई सकाळ

नगर : कोरोनाच्या निर्बंधामुळे गेल्या दीड वर्षांपासून शाळा बंद होत्या. राज्य शासनाच्या सुधारीत धोरणानुसार कोरोना रुग्ण नसलेल्या गावांमध्ये आठवी ते बारावीचे वर्ग सुरू करण्यास ग्रामपंचायतीला अधिकार प्रदान करण्यात आले आहेत. जिल्ह्यातील २०५ ग्रामपंचातींनी शाळा सुरू करण्याचे ठराव केले असून गुरूवारी (ता. १५) १३३ गावांमध्ये माध्यमिक विद्यालय सुरू झाले आहेत. (Schools have been reopened in 133 villages in Nagar district)

कोरोनाची दुसरी लाट ओसरण्यास सुरूवात झाली आहे. काही गावे कोरोना मुक्‍त झाले आहेत. कोरोना मुक्‍त गावांमध्येच आठवी ते बारावीचे वर्ग सुरू करण्यास राज्य शासनाने परवानगी दिली आहे. हे वर्ग सुरू करण्यासाठी ग्रामपंचायतीला ठराव घेऊन पंचायत समितीमार्फत जिल्हा परिषदेला पाठवावा लागतो. विद्यार्थ्यांच्या पालकांना हमीपत्र भरून द्यावे लागते. शिक्षकांनी बाहेरगावावरून जाऊन-येऊन करू नये, प्रत्येक विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक अंतर (सोशल डिस्टन्सिंगचे) पालन करणे आवश्‍यक आहे. वर्गाच्या बाहेरच विद्यार्थ्यांचे तापमान आणि पल्सची तपासणी केली जाते. ताप नसणाऱ्या विद्यार्थ्यांनाच वर्गात प्रवेश दिला जातो. पुस्तक, वही, पेन इतरांचा वापरू नये, पिण्याच्या पाण्यासाठी बाटली आणावी आदी अटींचे पालन करणे बंधनकारक आहे. जिल्ह्यात पहिल्याच दिवशी १३३ गावांमध्ये माध्यमिक विद्यालये सुरू करण्यात आले आहेत.

हेही वाचा: नगर जिल्ह्यात कोरोना बळींनी ओलांडला सहा हजारांचा टप्पा

तालुकानिहाय शाळा सुरू झालेल्या गावांची संख्या याप्रमाणेः

 • अकोले-४५

 • संमगनेर - २१

 • कोपरगाव - एक

 • राहाता - १९

 • राहुरी - ५

 • श्रीरामपूर - दोन

 • नेवासे - ११

 • शेवगाव - चार

 • पाथर्डी - ११

 • कर्जत - एक

 • श्रीगोंदे - चार

 • पारनेर - दोन

 • नगर - सात

गावांमध्ये माध्यमिक विद्यालये सुरू झाले आहेत. जामखेड तालुक्‍यात एकाही गावात शाळा सुरू झालेली नाही.

(Schools have been reopened in 133 villages in Nagar district)

हेही वाचा: नगर बाजार समितीत आवक वाढल्याने टोमॅटो स्वस्त; घेवडा महागला

loading image