

Maharashtra Education Dept Issues Tough Rules Against Student Punishment
sakal
अहिल्यानगर: ‘छडी लागे छम छम, विद्या येई घम घम’ अशा आशयाची बडबड गीते होती. हे गीत सर्व विद्यार्थी तालासुरात गात. आणि त्यानुसार गुरुजी विद्यार्थ्यांना निबर मारायचेही. त्याचे पालकांना आणि शिक्षण विभागालाही काही वाटायचे नाही. आता विद्यार्थ्यांना शारीरिक शिक्षा करायचे तर दूरच त्यांना रागावले, टोमणे मारले तरी कारवाईचा बडगा संबंधित शिक्षक व संस्थाचालकांवर उगारला जाणार आहे.