नगरमधील शाळा, शिकवण्याही बंद म्हणजे बंदच, जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश 

Schools in Ahmednagar closed, Collector orders
Schools in Ahmednagar closed, Collector orders
Updated on

नगर ः जिल्ह्यासह राज्यात कोरोना विषाणूचा प्रादूर्भाव आहे. त्यामुळे राज्य सरकारकडून अद्यापि शाळा व महाविद्यालय सुरु करण्यासंदर्भात कोणताच निर्णय घेतला नाही. सरकार कोणताच निर्णय घेत नसतानाही जिल्ह्यातील काही शाळांनी पालकांना सोशल मीडियाच्या माध्यमातून संदेश पाठवले जात आहेत. 

शाळा पालकांना त्यांच्या पाल्याचे आगामी वर्षाचे शैक्षणिक शुल्क भरण्यास प्रवृत्त करीत आहेत. काही शाळांनी तर आपण वेळेत पैसे नाही भरले तर आपल्या पाल्याचा शाळेतील प्रवेश रद्द करण्यात येईल, असा संदेशातून सज्जड इशारा पालकांना दिला जात आहे. 
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव असल्यामुळे जिल्ह्यातील शाळा व महाविद्यालयांबरोबरच खासगी शिकवण्या बंद राहतील. या काळात शैक्षणिक संस्थांच्या कार्यालयातील कर्मचारी केवळ ई-सामग्री तयार करणे, उत्तरपत्रिकांचे मूल्यांकन व निकाल जाहीर करणे हे कामकाज करण्यास परवानगी आहे. 

हाच कित्ता अनेक खासगी शिकवणी चालकांनीही सुरु केला आहे. शाळा सुरू होतील की नाही, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. त्यात शाळांकडून सुरु झालेल्या या दबंगिरीला पालक त्रस्त झाले आहेत. या संदर्भात शिक्षण विभागाकडे काहींनी तक्रारी करण्याच्या तयारी चालवली आहे. 

जिल्हाधिकाऱी राहुल द्विवेदी यांनी शाळा व महाविद्यालय बंद ठेवण्यासंदर्भात निर्णय घेतला आहे. या बरोबरच खासगी शिकवण्याही घेण्यावर बंदी कायम ठेवण्यात आली आहे. फक्त ऑनलाईन पध्दतीने शिकविण्यास परवानगी देण्यात आली आहे. 

शाळांचा अट्टाहास कशासाठी 
राज्य सरकारकडून शाळा व महाविद्यालय सुरू करण्यासंदर्भात अद्यापि ठोस निर्णय घेण्यात आला नाही. तरीसुध्दा शाळांकडून पैसे भरून घेण्याचा अट्टाहास नेमका कशासाठी चालला आहे, असा सवाल आता पालकांमधून उपस्थित करून एकमेकांना विचारला जात आहे. 

शिक्षण विभागाकडून कानटोचणी कधी? 
जिल्ह्यातील अनेक शाळांनी मागील व आगामी शुल्क वसुली सुरू केली आहे. या बाबत काही पालकांनी शिक्षण खात्याकडे तोंडी तक्रारी केल्या असल्या तरी शिक्षण विभागाकडून त्यावर ठोस भूमिका घेतली नाही. शिक्षण विभागाने अध्यादेश काढून शाळांकडून होणारी शुल्क वसुली थांबविण्याची मागणी होत आहे. शिक्षण विभागाच्या बोटचेपे धोरणाबाबत आश्‍चर्य व्यक्त केले जात आहे.  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com