
Students welcomed with roses as schools reopen after transfer dispute.
esakal
पोहेगाव: कोपरगाव तालुक्यातील रांजणगाव देशमुख येथील प्राथमिक शाळेतील शिक्षकांच्या बदल्या रद्द कराव्यात, या मागणीसाठी दोन दिवसांपासून विद्यार्थ्यांविना शाळा भरत होती. पालक वर्ग त्यांच्या मागणीवर ठाम होता. अखेर तिसऱ्या दिवशी प्रभारी गटशिक्षणाधिकारी शबाना शेख यांनी पालकांशी चर्चा केली. यावेळी त्यांनी एका महिला विषय शिक्षिकेला या ठिकाणी पाठविले जाईल व बदलून गेलेल्या एका शिक्षिकेला परत रांजणगाव देशमुख येथे आणण्यासाठी वरिष्ठांच्या मदतीने प्रयत्न करू, असे आश्वासन पालकांना दिले. त्यानंतरच तिसऱ्या दिवशी पालकांनी मुलांना शाळेत पाठविले. यावेळी विद्यार्थ्यांचे शिक्षकांनी गुलाबपुष्प देऊन स्वागत केले.