याला म्हणतात डेरिंग...या सचिवाने परस्पर वाढवला स्वतःचाच पगार, या मार्केट कमिटीतील काळाबाजार

संजय आ. काटे
गुरुवार, 2 जुलै 2020

सचिव डेबरे यांनी संचालकांसह संस्थेचा विश्वासघात केला आहे. त्यांनी त्यांची पगारवाढ करताना इतर कर्मचाऱ्यांचा विचार केलेला नाही.

श्रीगोंदे : कोणत्यातीही कर्मचार्याच्या जीवनात पगारवाढीला अनन्यसाधारण महत्त्व असते. एका वेतनवाढीसाठी तो जीवतोडून काम करतो. परंतु पगार झाली नाही तर काही नाराजही होतो. आणि पुन्हा टार्गेट पूर्ण करण्यासाठी जोमाने कामाला लागतो. परंतु श्रीगोंदा तालुक्यात एक अजब प्रकार घडला आहे.

एका सचिवाने स्वतःचाच पगार वाढवून घेतला. असे करताना त्याने कर्मचाऱ्यांचा विचारच केला नाही, दस्तुरखुद्द सभापतींनीच ही बाब निदर्शनास आणली आहे.

कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव दिलीप डेबरे यांनी संचालक मंडळाच्या कुठल्याही बैठकीत त्यांच्या पगार वाढीचा विषय मांडलेला नाही. त्यांनी संचालकांना अंधारात ठेवून स्वत:चा पगार वाढवून घेतला. 

ही पगारवाढ बेकायदेशीर असून सचिव डेबरे यांच्यावर थेट कारवाई करण्याची मागणी बाजार समिती सभापती धनसिंग भोईटे यांनी केली आहे.

हेही वाचा - श्रीगोंद्यात एकाचा हकनाक खून

बाजार समिती सचिव डेबरे यांनी त्यांची केलेली पगारवाढ बेकादेशिर असल्याप्रकरणी सध्या चौकशी सुरु आहे. त्याबाबत सभापती भोईटे यांनी जिल्हा उपनिबधकांना दिलेल्या जबाबात सचिव डेबरे यांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले आहे.

या बाबत बोलताना भोईटे म्हणाले, सचिव डेबरे यांनी संचालकांसह संस्थेचा विश्वासघात केला आहे. त्यांनी त्यांची पगारवाढ करताना इतर कर्मचाऱ्यांचा विचार केलेला नाही. शिवाय या पगारवाढीबाबत अगोदर संचालक मंडळाच्या बैठकीत विषय घ्यावा लागतो. मात्र, त्यांनी तसा कुठलाही विषय न घेता परस्पर पगारवाढ केली.

क्लिक करा - येथे आहे माकडीण-कुत्रीची दोस्ती

या बाबत सभापती या नात्याने त्यांनी आपल्याशी कुठलीही चर्चा केलेली नाही. उलट आता याप्रकरणी डेबरे यांच्यावर कारवाई अपेक्षीत आहे.

या बाबत आपणच पुढाकार घेवून आता पाठपुरावा करणार आहोत. अशा पध्दतीने संस्थेचे अधिकारी स्वार्थी पध्दतीने वागत असले तर शेतकरी व व्यापाऱ्यांच्या जीवावर उभी असणारी ही संस्था मोडीत निघेल. 

डेबरे यांनी त्यांचा पगार ज्या पध्दतीने वाढविला आहे त्यावरुन संस्थेत त्यांच्या काळात काही तरी घोटाळे झालेच असतील अशी शंका येत असून त्यांच्या काळातील कारभाराचीच चौकशीची मागणी आपण करणार असल्याचे भोईटे म्हणाले. 

अहमदनगर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The secretaries at Shrigonde increased their own salaries