स्वतःनेच केले स्वतःला नेत्रदान, जालन्याच्या रूग्णावर नगरमध्ये उपचार

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 5 December 2020

मरणोत्तर नेत्रदान होत नसल्याने बुब्बुळ उपलब्ध होत नव्हते. जंतुसंसर्ग झालेला डोळा काढून टाकणे हाच पर्याय होता.

नगर : जालना येथील एकाच्या डोळ्यात टीक पडल्याने ते उपचारासाठी साईसूर्या नेत्रालयात आले होते. एक डोळा निकामी झाला. दुसऱ्याला जंतुसंसर्ग होता. अशा परिस्थितीत डॉ. प्रकाश कांकरिया यांनी जंतुसंसर्ग झालेला डोळा काढला आणि निकामी डोळ्याचे बुब्बुळ काढून तेथे बसविला. यामुळे त्या व्यक्तीला नवी दृष्टी प्राप्त झाली. 

लक्ष्मणराव बोहरे (रा. परंडा, जि. उस्मानाबाद) असे त्या व्यक्तीचे नाव आहे. अपघाताने जखम होऊन त्यांच्या डोळ्याला जंतुसंसर्ग झाला. दुसरा डोळा अनेक वर्षांपासून, मेंदूपासून येणारी नस बंद पडल्याने निकामी होता.

हेही वाचा - लंके म्हणतात, आपला विषयच वेगळा

बोहरे यांच्या परिसरात उपचार होत नसल्याने ते साईसूर्य नेत्रसेवा रुग्णालयात आले. मरणोत्तर नेत्रदान होत नसल्याने बुब्बुळ उपलब्ध होत नव्हते. जंतुसंसर्ग झालेला डोळा काढून टाकणे हाच पर्याय होता. मात्र, नेत्रतज्ज्ञ डॉ. प्रकाश कांकरिया यांनी त्यांच्या डाव्या डोळ्याचे बुब्बुळ काढून उजव्या डोळ्यावर त्याचे रोपण केले. त्यामुळे त्यांना दिसू लागले. त्यांच्यासह नातेवाइकांना मोठा आनंद झाला. एकंदर काय तर स्वतःने स्वतःला नेत्रदान केले.

संपादन - अशोक निंबाळकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Self-donated eye, Jalna patient treated in Ahmednagar