Senapati Bapat Fraud Case: मल्टी स्टेटने राज्यात शाखा विस्ताराचे मोठे जाळे उभारले. राज्य कार्यक्षेत्र असलेल्या या संस्थेच्या २९ शाखा आहेत. या संस्थेत सुमारे २०० कोटींच्या ठेवी अडकल्या आहेत. गेल्या काही दिवसांपासून ठेवीदारांना त्यांच्या ठेवी परत केल्या नाहीत.
पारनेर: सेनापती बापट मल्टी स्टेट पतसंस्थेचे अध्यक्ष रामदास भोसले यांच्यासह संचालकांचा अटकपूर्व जामीन अर्ज जिल्हा सत्र न्यायाधीश एम. एस. लोणे यांनी फेटाळला आहे. या पूर्वीही कार्यकारी संचालक व काही संचालकांचे जामीन फेटाळले आहेत.