Sakal Relief Fund:'पूरग्रस्तांसाठी धावली ज्येष्ठ अभियंता संघटना'; ‘सकाळ’ रिलिफ फंडासाठी दोन लाख रुपयांची मदत..

Senior Engineers Extend Swift Help to Flood-Affected Families: अहिल्यानगरमध्ये जलसंपदा व सार्वजनिक बांधकाम विभागातील निवृत्त अभियंत्यांची ही संघटना आहे. सेवानिवृत्तीनंतरही हे सर्व सामाजिक उपक्रमात हिरिरीने भाग घेत असतात. कोल्हापूर जिल्ह्यातील पूरग्रस्तांसाठीही या ज्येष्ठ अभियंता संघटनेने मोठी मदत केली होती.
Senior Engineers’ Association donates ₹2 lakh to Sakal Relief Fund to assist flood-affected families in Maharashtra.

Senior Engineers’ Association donates ₹2 lakh to Sakal Relief Fund to assist flood-affected families in Maharashtra.

Sakal

Updated on

अहिल्यानगर: पूरग्रस्तांच्या मदतीसाठी येथील ज्येष्ठ अभियंता संघटना धावून आली आहे. संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी आज सकाळ रिलिफ फंडासाठी दोन लाख चार हजार सोळा रुपयांचा धनादेश दिला. सकाळचे सहसंपादक प्रकाश पाटील यांनी तो स्वीकारला. यावेळी मुख्य व्यवस्थापक (जाहिरात) दीपक देशमुख, प्रिन्सिपल करस्पॉन्डंट अशोक निंबाळकर उपस्थित होते.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com