
यावेळी अण्णांनी वयाचा विचार करता उपोषण करण्याऐवजी मौन आंदोलन करावे, अशी विनंती पवार यांनी हजारे यांना केली.
राळेगणसिद्धी (अहमदनगर) : आता निवडणूक संपली आहे. गावासाठी सगळ्यांनी एकत्र आलं पाहिजे. निवडणुकीत विरोधातील व्यक्ती पाहण्यापेक्षा संपूर्ण गाव पाहिले पाहिजे. व्यक्तीपेक्षा गाव मोठे असते. गाव डोळ्यासमोर ठेवून गावाचा विकास सुरू ठेवा. असा सल्ला जेष्ठ समाजसेवक अण्णासाहेब हजारे यांनी पोपटराव पवारांना दिला.
अहमदनगरच्या बातम्यांसाठी येथे क्लिक करा
आदर्श गाव योजनेचे कार्याध्यक्ष तथा पद्मश्री पोपटराव पवार यांनी ग्रामपंचायत निवडणुकीच्या निकालानंतर गुरुवारी प्रथमच राळेगणसिद्धी हजारे यांची भेट घेत आशिर्वाद घेतले. यावेळी हिवरेबाजार निवडणुकीत विजय मिळवल्याबद्दल हजारे यांनी त्यांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या. यावेळी अण्णांनी वयाचा विचार करता उपोषण करण्याऐवजी मौन आंदोलन करावे, अशी विनंती पवार यांनी हजारे यांना केली.
ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आपण केलेल्या मागण्या योग्य आहेत. सध्याचे वय पाहता आता उपोषण न करता मौन आंदोलन करावे. राष्ट्राला आणि समाजाला तुमची खूप गरज आहे. मौनात खूप ताकद असते आणि त्यातून जनतेमध्ये चांगला संदेश जाईल. आरोग्याची काळजी व दक्षता घ्या. तुमच्या सरकारकडे ज्या मागण्या आहे. त्यावर सरकार नक्कीच सकारात्मक प्रयत्न करील, असे सकाळशी बोलताना पवार म्हणाले.